शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज नौटंकी करण्यात माहीर - सोनिया गांधी

By admin | Updated: August 7, 2015 12:03 IST

सुषमा स्वराज या नौटंकी करण्यात माहीर असून मी कायदा तोडून एखाद्या महिलेला कधीच मदत केली नसती असे प्रत्युत्तर सोनिया गांधी यांनी दिले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - सुषमा स्वराज या नौटंकी करण्यात माहीर असल्याची बोचरी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. तर स्वराज कुटुंबाला ललित मोदींकडून किती पैसे मिळाले हे सुषमा स्वराज यांनी जाहीर करावे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. 
गुरुवारी लोकसभेत उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी ललित मोदींच्या मरणासन्न पत्नीला माणूसकीच्या दृष्टीने मदत केली असे म्हटले होते.  माझ्या ठिकाणी सोनिया गांधी असत्या तर त्यांनी काय केले असते असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. स्वराज यांच्या स्पष्टीकरणावर शुक्रवारी सोनिया गांधी व राहुल गांधींनी भाष्य केले. मी माणूसकीच्या दृष्टीने महिलेला मदत केली असती पण त्यासाठी मी कायद्याचे उल्लंघन केले नसते असे सडेतोड उत्तर सोनिया गांधींनी दिले. 
सुषमा स्वराज यांच्या विधानाविषयी राहुल गांधी म्हणाले, चोर दबक्या पावलाने येऊन चोरी करुन जातो, त्याचप्रमाणे सुषमा स्वराज यांनी सर्वांपासून लपून ललित मोदींना मदत केली. सुषमा स्वराज यांनी जे केले ते माझ्या आईने कधीच नसते केले असे सांगत त्यांनी स्वराज यांना प्रत्युत्तर दिले. 
दरम्यान, काँग्रेस खासदारांनी शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या स्मारकाजवळ धरणे आंदोलन केले. 'मोदींनी मौन सोडावे, हुकूमशाही वृत्ती चालणार नाही' अशी घोषणा याप्रसंगी देण्यात आली.