शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मेहबुबा मुफ्ती यांचा आज शपथविधी

By admin | Updated: April 4, 2016 02:44 IST

पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती या आज सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण करणार आहेत.

जम्मू : पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती या आज सोमवारी जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण करणार आहेत. मुस्लिमबहुल जम्मू-काश्मिरात भाजपसोबत आघाडी सरकारचे नेतृत्व करणार असलेल्या मेहबुबा या देशातील दुसऱ्या मुस्लिम महिला मुख्यमंत्री असतील.राज्यपाल एन.एन. व्होरा हे ५६ वर्षीय मेहबुबा मुफ्ती आणि त्यांच्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. मेहबुबा यांच्यासोबत आघाडीचे १६ कॅबिनेट आणि ८ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. त्यातील भाजपच्या दोन मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार देण्यात येईल. याआधी मुफ्ती मोहंमद सईद यांच्या मंत्रिमंडळात राहिलेले पीडीपीचे सर्व मंत्री मेहबुबा यांच्याही मंत्रिमंडळात कायम राहणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. भाजपने मात्र माजी राज्यमंत्री पवनकुमार गुप्ता यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्या जागी नवा चेहरा दिसेल.मेहबुबा मुफ्ती यांचे रविवारी दुपारी आपल्या कुटुंबियांसमवेत जम्मूत आगमन झाले. मेहबुबा या देशातील दुसऱ्या महिला मुस्लिम मुख्यमंत्री बनणार आहेत. याआधी ६ डिसेंबर १९८० रोजी सईदा अन्वरा तायमूर यांना देशातील पहिल्या मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला होता. त्या ३० जून १९८१ पर्यंत आसामच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी शनिवारी मेहबुबा मुफ्ती यांना राज्यात पीडीपी-भाजप आघाडी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते.