भोर तालुक्यात महाशिवरात्री साजरी
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती.
भोर तालुक्यात महाशिवरात्री साजरी
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. शहरापासून १२ किलोमीटरवर निर्सगरम्य परिसरात पांडवकालीन नागेश्वराचे पुरातन मंदिर आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त सकाळी अभिषेक करण्यात आला. नागेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. भोरचे राजे पंतसचिव यांनी बांधलेल्या संस्थानकालीन भोरेश्वराच्या मंदिरातही दिवसभर दर्शनरांगा लावल्या होत्या. महामार्गावरील धांगवडी येथील आडबलसिद्धनाथ, भांबटमाळ येथील पुरातन नागेश्वराच्या व मोहरी येथील अमृतेश्वर मंदिरातही भाविकांनी गर्दी केली होती. रायरेश्वर किल्ल्यावरील रायरेश्वराच्या शिवकालीन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. (संपादन : बापू बैलकर)