शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या वाट्याला २,०७५ कोटी

By admin | Updated: April 6, 2015 01:04 IST

केंद्रीय करांच्या वाट्यापोटी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना वर्ष २०१५-१६ मध्ये हस्तांतरित करायच्या निधीचा ३७,४२० कोटी

नवी दिल्ली : केंद्रीय करांच्या वाट्यापोटी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना वर्ष २०१५-१६ मध्ये हस्तांतरित करायच्या निधीचा ३७,४२० कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्र सरकारने रविवारी जारी केला. त्यानुसार महाराष्ट्राला २,०७५ कोटी रुपये मिळणार आहेत.वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकारने यंदाच्या वर्षासाठीचा पहिला हप्ता म्हणून सर्व राज्यांना मिळून ३७,४२० कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे, असे वित्त मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.१४ व्या वित्त आयोगाने केंद्रीय करांमधील राज्यांच्या वाट्यामध्ये १० टक्के एवढी विक्रमी वाढ करण्याची शिफारस केली. ती केंद्र सरकारने स्वीकारल्याने वर्ष २०१४-१५ मध्ये राज्यांना १.७८ कोटी रुपयांचा वाढीव निधी केंद्राकडून मिळणार आहे. चालू वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपये मिळतील. गेल्या वर्षी ही रक्कम ३.४८ लाख कोटी रुपये होती. २०१९-२० पर्यंतच्या पाच वर्षांत राज्यांना केंद्रीय करांमधील वाट्यापोटी एकूण ३९.४८लाख कोटी रुपये मिळायचे आहेत.रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील वित्त आयोगाने वित्तीय तूट असलेल्या ११ राज्यांना ४८,९०६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याचीही शिफारस केली. पाच वर्षात मिळून या राज्यांना १.९८ लाख कोटी रुपये जादा मिळतील. यंदा विभाजनानंतरचे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व जम्मू-काश्मीरला हे अनुदान मिळेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)