शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

महाराष्ट्राच्या १४ एफएम चॅनल्सना बोलीदार नाही

By admin | Updated: August 19, 2015 01:15 IST

महाराष्ट्राच्या २९ एफएम चॅनल्सपैकी १४ चॅनल्ससाठी वाईट दिवस आले आहेत. ई-लिलावात या १४ चॅनल्ससाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या २९ एफएम चॅनल्सपैकी १४ चॅनल्ससाठी वाईट दिवस आले आहेत. ई-लिलावात या १४ चॅनल्ससाठी एकाही कंपनीने बोली लावली नाही. राज्यातील कमी मान्सूनचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. जाहिरातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नात घट होईल, या भीतीपोटी खासगी एफएम कंपन्यांनी बोली लावण्याची जोखीम पत्करली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.एफएम रेडियो चॅनल्सच्या लिलावाच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या फेरीत ६९ शहरांच्या १३५ चॅनल्ससाठी गेल्या २७ जुलैपासून बोली लावण्यात येत आहे. हा लिलाव केव्हा संपणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण ज्या शहरांमध्ये कंपन्यांना जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे त्या शहरांसाठी जास्त बोली लावण्यात येत आहे. परंतु १३ शहरांच्या ४३ चॅनल्ससाठी अद्याप एकाही कंपनीने बोली लावली नाही. लिलावाच्या १६ व्या दिवशी ६४ फेरीच्या बोली लागल्या. त्यानंतर ५६ शहरांच्या ९२ चॅनल्ससाठी कंपन्यांनी एकूण १०९० कोटी रुपयांची बोली लावलेली आहे, जी या चॅनल्सच्या एकूण राखीव ४५१ कोटी रुपयांपेक्षा ६३९ कोटींची जास्त आहे. त्यामुळे माहिती व प्रसारण खात्याला मोठा नफा होईल, यात शंका नाही. कंपन्यांनी महानगरांना प्राधान्य दिले आहे तर छोट्या व एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांबाबत कंपन्यांनी रुची दाखविलेली नाही. (प्रतिनिधी)