रघुनाथ पांडे, नवी दिल्लीएचआयव्ही बाधित रूग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावरही त्याचे आयुर्मान १५ वर्षांपेक्षा अधिककाळ वाढविणाऱ्या ‘फ्री अॅण्टीरिट्रोव्हायरल थेरपी’(एआरटी)या उपचारपध्दतीचा देशात सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याचे केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे.मागील तीन वर्षांत एक लाख ८५ हजारावर रूग्णांनी ही उपचारपध्दती स्वीकारली असून महाराष्ट्रात सध्या तीन लाख २१ हजारांवर एचआयव्ही बाधित आहेत. या खालोखाल आंध्रप्रदेश (१, ८३ लाख), कर्नाटक (१,१५ लाख), तमीळनाडू (८५, १५५) मधील रूग्णांचा ओढा या उपचारपध्दतीकडे आहे, असे मार्च महिन्याच्या अहवालात म्हटले आहे. बिहार(२३ हजार), गुजरात (४३ हजार), राज्यस्थान (२२ हजार), उत्तरप्रदेश (३८ हजार) असा क्रम आहे.रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यूच्या दिशे़ने जाणाऱ्या रूग्णाचे आयुष्य वाढावे यासाठी असलेल्या अनेक उपचारापैकी एक ‘फ्री अॅण्टीरिट्रोव्हायरल थेरपी’(एआरटी)ही उपचारपध्दती असून, सरकारने यासाठी राज्य स्तरावरील जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केले. महाराष्ट्रात ७२ व मुंबईत १२ केंद्र तिथे या रूग्णाच्या उपचाराची काळÞजी घेतली जाते. तिथे रूग्णांचे समुपदेश करून १८ विविध गोळ््या असणारे एक महिन्याचे औषध त्याला दिले जात असून त्याची रोग प्रतिकारशक्ती सुधारते, वेदनाही कमी होतात.
आयुष्य वाढविणाऱ्या उपचारपध्दतीत महाराष्ट्र अग्रेसर
By admin | Updated: April 11, 2015 02:25 IST