शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 05:36 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या मराठीबहुल बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळविता आली नाही.

बेळगाव : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या मराठीबहुल बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीला एकही जागा मिळविता आली नाही. जिल्ह्यातील १८पैकी १० जागा भाजपाला, तर ८ जागी काँग्रेसला विजय मिळाला. २०१३च्या निवडणुकीत एकीकरण समितीचे दोन आमदार होते.कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये झाली. महाराष्टÑ एकीकरण समितीचा गड समजल्या जाणाºया बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण व खानापूर या चारही मतदारसंघांत एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत झाले. या चार जागापैकी काँग्रेस - भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. खानापूर वगळता समितीच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.बेळगाव जिल्ह्यातील विजयी उमेदवार :भाजपा : अभय पाटील (बेळगाव दक्षिण), अनिल बेनके (बेळगाव उत्तर), दुर्योधन ऐहोळे (रायबाग), पी. राजीव (कुडची), शशिकला ज्वोल्ले (निपाणी), महांतेश दोड्डगौडर (कित्तूर), उमेश कत्ती (हुक्केरी), भालचंद्र जारकीहोळी (अरभावी), आनंद मामनी (सौंदत्ती), महादेवअप्पा यादवाड (रामदुर्ग). काँग्रेस : लक्ष्मी हेब्बाळकर (बेळगाव ग्रामीण), डॉ. अंजली निंबाळकर (खानापूर), महेश कुमठळ्ळी (अथणी), श्रीमंत पाटील (कागवाड), गणेश हुक्केरी (चिक्कोडी), सतीश जारकीहोळी (यमकणमर्डी), महांतेश कौजलगी (बैलहोंगल), रमेश जारकीहोळी (गोकाक).>डॉ. अंजली निंबाळकर विजयीखानापूर मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या डॉ. अंजली हेमंत निंबाळकर या निवडून आल्या. त्यांनी भाजपाच्या विठ्ठल हलगेकर यांचा पाच हजार १३३ मतांनी पराभव केला. निंबाळकर यांना ३६,६४९, भाजपाचे विठ्ठल हलगेकर यांना ३१५१६, जनता दलाच्या नाशीर बागवान यांना २७२७२, एकीकरण समितीच्या अरविंद पाटील यांना २६,६१३, तर समितीचे बंडखोर विलास बेळगावकर यांना १७,८५१ मते पडली. अंजली या कर्नाटकचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या त्या नातेवाईक आहेत.