शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य

By admin | Updated: November 1, 2016 03:37 IST

कृषी क्षेत्रातील सुधारणांवरील नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गुजरात आणि राजस्थाननंतर देशात महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य म्हणून पुढे आले

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील सुधारणांवरील नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गुजरात आणि राजस्थाननंतर देशात महाराष्ट्र शेतकरी अनुकूल राज्य म्हणून पुढे आले आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याच्या ‘कृषी विपणन आणि शेतकरी अनुकूल सुधारणा निर्देशांक’च्या आधारावर नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे. कृषी क्षेत्रात विविध सुधारणा लागू करण्यात राज्याने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने विपणन सुधारणा लागू करतानाच देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी व्यवसायासाठी सर्वोत्तम वातावरण तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी सुधारणांमध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू व काश्मीर या राज्यांसह २९ राज्यांपैकी २० राज्यांनी खराब प्रदर्शन केले आहे. निर्देशांकामध्ये राज्याच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि छत्तीसगडचा क्रमांक लागतो. कमी उत्पादन, कमी कृषी उत्पादन आणि कृषी संकटाने ग्रस्त असलेल्या राज्यांची ओळख करून त्यांना मदत करण्याचा निर्देशांकाचा मुख्य उद्देश आहे. देशात कृषी विपणनात सुधारणा, जमीनपट्टा सुधारणा आणि खासगी जमिनीवर वन्य संबंधित सुधारणा करून कृषी उत्पन्न दुपट्ट करण्याच्या उद्देशाने नीती आयोगाने हे पाऊल उचलले आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये अर्धवट, आंशिक, किरकोळ आणि फारच कमी कृषी सुधारणा झाल्याचे आयोगाच्या विस्तृत अहवालात नमूद केले आहे.