शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननात महाराष्ट्र पुढे

By admin | Updated: March 25, 2017 00:18 IST

खनिजांच्या अवैध उत्खननाचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. हे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खनिज चोरांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही हे सत्र थांबलेले नाही.

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीखनिजांच्या अवैध उत्खननाचे सर्वाधिक प्रकार महाराष्ट्रात घडत आहेत. हे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खनिज चोरांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही हे सत्र थांबलेले नाही. खाणमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात अवैध उत्खननाचे १,०२,८१४ प्रकार उजेडात आले आहेत. यात २०१३-१४ मध्ये ३६,४७६, २०१४-१५ मध्ये ३२,७१७ आणि २०१५-१६ दरम्यान ३३,६२१ प्रकार समोर आले होते. ठेवत नाही आकडेवारी -भाजपाच्या किरण खेर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना गोयल यांनी लोकसभेत सांगितले की, अवैध उत्खननाबाबत केंद्रीय मंत्रालय पातळीवर माहिती ठेवली जात नाही. राज्य सरकारकडून उत्खननाबाबत तिमाही अहवाल मिळत असतो, असे ते म्हणाले. उत्खननप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, खाण मंत्रालयाकडे याची आकडेवारी उपलब्ध नाही. २२ विशेष दल-एमएमडीआर कायद्यात सुधारणा करून बेकायदा उत्खनन करणाऱ्यांना दंड आकारण्याची तरतूद कठोर करण्यात आली आहे. अवैध उत्खनन थांबविण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेशासह २२ राज्यांत कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. गौण खनिज चोरीच्या या घटनांत राज्य सरकारने चोरांकडून मोठा दंडही वसूल केला आहे. गेल्या तीन वर्षांत १६४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापैकी २०१३-१४ मध्ये ५१ कोटी रुपये, २०१४-१५ मध्ये ४२ कोटी रुपये आणि २०१५-१६ दरम्यान ७१ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. अवैध उत्खननावर उपग्रहाद्वारे लक्ष-याचबरोबर उत्खनन निगराणीप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यात सामान्य नागरिकही अवैध उत्खननाची तक्रार करू शकतात. उपग्रहांद्वारे अवैध उत्खननावर नजर ठेवण्यात येते. या प्रणालीत खनिज पट्ट्यात अतिरिक्त उत्खनन होत असल्यास त्याबाबत राज्य सरकारला कळविण्यात येते.मध्य प्रदेशात खनिजांच्या अवैध उत्खननाचे कमी प्रकार उजेडात आले. तथापि, अधिक दंड वसूल करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत येथे जवळपास १६७ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ११० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.