शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

संतप्त द्रौपदीमुळे राज्यसभेत महाभारत

By admin | Updated: March 17, 2017 00:54 IST

महाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवणाऱ्या रूपा गांगुलींनी राज्यसभेत रूद्रावतार धारण केल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला.

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीमहाभारत मालिकेत द्रौपदीची भूमिका वठवणाऱ्या रूपा गांगुलींनी राज्यसभेत रूद्रावतार धारण केल्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ उडाला. काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी शून्यप्रहरात पश्चिम बंगालमधील बाल तस्करीकडे सभागृहाचे लक्ष वेधला.त्या म्हणाल्या की सभागृहात उपस्थित असलेल्या एक सदस्य व सभागृहाचे सदस्य नसलेले एक नेते यांचा उल्लेख पोलीस तपासात प्रमुख आरोपीने केला आहे.पाटील यांचे विधान ऐकताच जोरदार आक्षेप नोंदवत भाजपच्या सदस्या रूपा गांगुली उसळून उठल्या. ‘मी इथे हजर आहे, सदर प्रकरणात मला बोलू द्या, मला बोलू दिले नाही तर सभापतींजवळ येउन मी बोलेन’ असे ओरडत त्या थेट उपसभापतींच्या आसनापर्यंत पोहोचल्या. उपसभापती कुरियन त्यावर म्हणाले, एकतर शून्य प्रहराच्या यादीत तुमचे नाव नाही. जो विषय पाटील यांनी मांडला त्यात तुमचा नामोल्लेख कुठेही नाही. त्यामुळे तुम्हाला बोलू देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवींनी गांगुलींना रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्यांनाही गांगुलींनी जुमानले नाही. पश्चिम बंगालमधे विमला शिशुगृहाच्या संचालिका चंदना चक्रवर्ती यांच्यावर बाल तस्करीचा आरोप राज्य सीआयडीने ठेवला आहे. चौकशीत चंदनाने आपण पूर्णत: निर्दोष असून, भाजपच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली व नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या सहकार्याने हे शिशुगृह आपण चालवतो. अटक करायचीच असेल तर सर्वांनाच करा, असे म्हटले होते. देखो, देखो कौन आया है? हिंदुस्थानका शेर आया है!गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत आले तेव्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांना उद्देशून ‘देखो, देखो कौन आया है?, असा कुत्सित टोमणा एक सूरात मारला. स्वत: मोदी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु भाजपा सदस्यांनी तशाच एकसूरात ‘हिंदुस्थान का सेर आया है!, असे उत्तर देऊन विरोधकांना गप्प केले.उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भाजपाने अभूतपूर्व विजय मिळविल्यानंतर मोदी प्रथमच राज्यसभेत आले होते. मोदी जेमतेम १५ मिनिटे राज्यसभेत बसले व सदस्यांकडून उपस्थित केले गेलेले केंद्रीय विद्यालयांमधील रिक्त जागा व देशात डोक्यावरून मैला वाहून नेण्याची कुप्रथा अजूनही सुरू असल्याविषयीचे प्रश्न त्यांनी ऐकले. लोकसभेत मंत्री गैरहजरपंतप्रधान मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला हजेरी लावली, पण लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला मात्र पंतप्रधानांसह एकही वरिष्ठ मंत्री किंवा भाजपाचा वरिष्ठ नेता हजर नव्हता. मोदी आणि स्वराज यांच्याखेरीज राजनाथ सिंग, अरुण जेटली, नितीन गडकरी असे कोणीही हजर नसल्याने सत्ताधारी पक्षाची पहिली रांग रिकामी होती. पहिल्या रांगेत बसणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी हेही हजर नव्हते तर लालकृष्ण आडवाणी प्रश्नोत्तराचा तास संपताना येऊन स्थानापन्न झाले.