शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

बिहारच्या महाभारतात सासऱ्यांविरुद्ध उभे ठाकले जावई!

By admin | Updated: September 28, 2015 23:38 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी तिकीट वाटपात मुलांना झुकते माप दिले पण जावयांना बाजूला सारले. त्यामुळे हे जावई आता बंडाळीच्या पवित्र्यात आहेत.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षांच्या नेत्यांनी तिकीट वाटपात मुलांना झुकते माप दिले पण जावयांना बाजूला सारले. त्यामुळे हे जावई आता बंडाळीच्या पवित्र्यात आहेत. दिग्गज नेत्यांच्या या जावयांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली असून मुलांना तिकीट मग आम्हाला का नाही? असा सवाल त्यांनी आपल्या सासऱ्यांना विचारला आहे. जावयांच्या या मागणीवरून प्रामुख्याने लोक जनशक्ती पार्टी (लोजपा), राष्ट्रीय जनता दल (राजद)आणि हिंदुस्तान अवाम मोर्चा (हम) हे पक्ष संकटात सापडले आहेत. लोजपा प्रमुख रामविलास पासवान यांचे जावईद्वय अनिलकुमार साधु आणि मृणाल तिकीट मिळविण्यासाठी सासरेबुवांवर दबाव आणण्यात अपयशी ठरले आहेत. पत्ता कट झाल्याने साधु एवढे नाराज झाले की त्यांनी थेट सासऱ्यांसोबतच बंडखोरी करून खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीचा (जअपा) रस्ता धरला. मृणाल यांनी अद्याप पासवान अथवा लोजपाविरुद्ध वक्तव्य केले नसून ते कुठला पवित्रा घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. साधु यांनी जअपात सामील झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी उषा पासवान संयुक्त प्रचाराद्वारे लोजपाला नाकेनऊ आणू अशी धमकी दिली आहे. साधु त्यांचे साळे खा. चिराग पासवान यांच्यावरही फार नाराज आहेत. रामविलास पासवान यांनी त्यांचे बंधु खा. रामचंद्र पासवान यांचे पुत्र प्रिंस राज यांना कल्याणपूर मतदार संघातून पक्षाचे उमेदवार बनविले आहे. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे जावई देवेंद्र मांझी तिकीट न मिळाल्याने प्रचंड संतापले आणि जअपात सामील झाले. ते बोधगया येथून रिंगणात आहेत.मांझी यांचा हम रालोआचा घटक आहे. विशेष म्हणजे देवेंद्र मांझी हे जीतनराम मांझी यांचे खासगी सचिव आहेत. आपले साळे संतोषकुमार सुमन यांना तुंबा(सु) मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळाले मग मला का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. समाजवादी पार्टी महाआघाडीपासून विभक्त झाल्यामुळे राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे जावई आणि सपा खासदार तेज प्रताप यांनीही नाराजी जाहीर केली आहे. महाआघाडीला धडा शिकविण्यासाठी सासऱ्याच्या पक्षातील उमेदवारांना पराभूत करण्याचा विडा त्यांनी उचलला असून पत्नी राजलक्ष्मी यांच्यासह ते प्रचारात उतरणार आहेत. सासऱ्यांच्या पक्षामुळे नाराज जावयांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न जअपाने केला आहे. परंतु निवडणुकीनंतर हे बंडखोर जावई कुणाच्या बाजूने राहतात हे बघायचे आहे. (वृत्तसंस्था)