- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीबिहार निवडणुकीच्या राजकारणात नवा रंग भरणाऱ्या हैदराबादच्या ओवेसी बंधूंनी लालूप्रसाद, नितीशकुमार आणि काँग्रेसच्या महाआघाडीला तूर्त तरी मोठा दिलासा दिला आहे. सीमांचलच्या किशनगंज जिल्ह्यात ४ आणि शेजारच्या अररिया जिल्ह्यात २ अशा अवघ्या ६ जागांवर अ.भा. मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन तथा एमआयएमचे उमेदवार आपले भाग्य अजमावणार आहेत, अशी माहिती ओवेसींच्या निकटवर्तीयांकडून दिल्लीत प्राप्त झाली. बिहारचा सीमांचल हा बहुसंख्य मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेला भाग आहे.
महाआघाडीला ओवेसी बंधूंचा दिलासा
By admin | Updated: October 7, 2015 02:54 IST