शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या विकास आराखड्यात महाघोटाळा - राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: February 17, 2017 17:12 IST

पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले़

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 17 - पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.पुण्यात आले असताना काँग्रेस भवनमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, पुण्याचा विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण कोणत्या पुढारी, बिल्डरच्या सांगण्यावरुन बदल करण्यात आला. हा विकास आराखडा बिल्डरांनी तयार केल्याचे सांगितले जात आहे़ येथील वाड्यांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षात भाजप सरकारने पुणेकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे. मागील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेहजार कोटींची घोषणा केली होती़ त्यापैकी ६ रुपयांचीही तरतुद केलेली नाही. नुकतेच ते पुण्यात येऊन गेल्याचे समजले. पण कोणतीही घोषणा केली नाही, याचे आश्चर्य वाटतंय. भाजपने पुणेकरांना गृहीत धरण्याचे काम केले आहे. पुणेकरांनी त्यांना २ खासदार, ८ आमदार निवडून दिले. त्यांचे पुण्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात पुण्याला केवळ १९ लाख रुपये मिळाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. शैक्षणिक हब व माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक झाला हा या २ वर्षात झालेला नाही. आज जगात पुण्याचे जे नाव घेतले जाते़ त्याचे शंभर टक्के श्रेय हे काँग्रेसला असल्याचे सांगून विखे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचा सरकार म्हणून काय भूमिका आहे, हे लोकांना ऐकायचे होते़ पण, त्या दोघांकडे कुठलाही अजेंडा नाही़ गेल्या २५ वर्षात इतक्या निचांकी पातळीवर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी प्रचार नेल्याचे आपण पाहिले नव्हते़ हे महाराष्ट्राचे दुदैव आहे़ २ -३ ग्लास पाणी पिऊन मुख्यमंत्री शिवसेनेची औकात काढत आहेत़ येत्या २३ तारखेला जनता त्यांना त्यांची औकात दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले़ अशी ही बनवाबनवीकाही वर्षांपूर्वी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता. त्यात दोघांनी अफलातून अभिनय केला होता़ त्यांना या दोघांनी मागे टाकले आहे. अशोक आणि सचिनाच्या जागी देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे आता फोटो छापावे लागतील, असा टोला विखे पाटील यांनी लगावला.