शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मॅगीला क्लीन चिट नाहीच

By admin | Updated: January 14, 2016 01:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने अजूनही मॅगीला क्लीन चिट दिली नसून मॅगी नूडल्समधील शिसे आणि ग्लुटामिक अ‍ॅसिडचे प्रमाणही कायदेशीर मर्यादेत आहे की नाही याचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजूनही मॅगीला क्लीन चिट दिली नसून मॅगी नूडल्समधील शिसे आणि ग्लुटामिक अ‍ॅसिडचे प्रमाणही कायदेशीर मर्यादेत आहे की नाही याचे स्पष्टीकरण म्हैसूर येथील शासकीय अन्न चाचणी प्रयोगशाळेला मागितले आहे.म्हैसूर प्रयोगशाळेकडून मिळालेल्या दोन पत्रांचे अध्ययन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हा आदेश दिला. याच प्रयोगशाळेने मॅगीच्या नमुन्यांमधील मोनोसोडियम ग्लुटामेटच्या (एमएसजी) प्रमाणाची चाचणी केली होती. मॅगीचे निर्माता नेस्ले इंडियाने मात्र हे प्रमाण अन्न सुरक्षा कायद्यानुसारच असल्याचा दावा केला होता. तर केंद्र सरकारने इतर सर्व मानकांच्या सर्वंकष अध्ययनाची गरज व्यक्त केली होती. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने कुठलाही अंतरिम आदेश देण्यात येत नसल्याचे स्पष्ट करून यासंदर्भात स्पष्टीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांचाही या पीठात समावेश आहे.पीठाने सांगितले की, आम्ही चाचणी अहवालांचे अध्ययन केले आहे. त्यानुसार केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, म्हैसूरने न्यायालयाला दोन पैलूंबाबत सविस्तर माहिती द्यावी. एक म्हणजे शिशे आणि ग्लुटामिन अ‍ॅसिडचे प्रमाण मंजूर मापदंडानुसार आहे काय आणि दुसरे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नियमांचे त्यात पालन झाले आहे?प्रयोगशाळेला अतिरिक्त नमुन्यांची गरज भासल्यास संबंधित विभागाकडे त्याची मागणी करता येईल, अशी मुभाही न्यायालयाने दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी पीठाने आठ आठवड्यांचा कालावधी दिला असून पुढील सुनावणी ५ एप्रिलला होईल. न्यायालयाने गेल्या वर्षी १६ डिसेंबरला मॅगी नुडल्सच्या नमुन्यांची म्हैसूर येथील प्रयोगशाळेत चाचणीचे निर्देश दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)