नवी दिल्ली : मॅगी नूडल्समध्ये शरीरास हानिकारक घटक आढळल्यानंतर केंद्रासह दिल्ली, केरळ, हरियाणा यांसह विविध राज्यांनी या उत्पादनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. दिल्ली सरकारने प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मॅगी नूडल्सचे १३पैकी १० नमुने ‘फेल’ ठरले आहेत. केरळ सरकारने किरकोळ बाजारात मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी लादली आहे. हरियाणा, कर्नाटक सरकारने राज्यभरातून मॅगीचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असून, ते नमुनेही सदोष आढळल्यास नेस्ले कंपनीचे हे लोकप्रिय उत्पादन बाजारातून काढून घेण्याचा इशारा दिला आहे. या उत्पादनाची जाहिरात करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा तसेच नेस्ले इंडिया कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारातील मुजफ्फरपूर येथील न्यायालयाने दिले. गरज भासल्यास या सर्वांना अटक करा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मॅगी गॅसवर!
By admin | Updated: June 3, 2015 03:59 IST