चेन्नई : बालकांवरील बलात्काराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बलात्काऱ्यांचे लिंग निकामी किंवा बधीर करण्यासारखे कठोर कायदे हवे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले आहे.सकारात्मक निकाल मिळण्यासाठी पारंपरिक कायदे कठोर ठरत नाहीत. लिंग निकामी करणे हे क्रूर वाटत असले तरी अशा घृणास्पद कृत्यांना आळा घालण्यासाठी शिक्षेचे मॉडेलही तशाच पद्धतीचे कठोर असायला हवे, असे न्या. किरूबाकरन यांनी स्पष्ट केले. २०११ मध्ये एका ब्रिटिश नागरिकाने १५ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत रविवारी उपलब्ध करवून देण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बलात्काऱ्यांना नपुंसक बनवावे- मद्रास हायकोर्ट
By admin | Updated: October 27, 2015 02:42 IST