शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अनिश्चित काळासाठी उपोषणावर

By admin | Updated: June 9, 2017 20:36 IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलनं सुरु आहेत.

ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलनं सुरु आहेत. मध्यप्रदेशातील आंदोलनात काही शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. तीन दिवसानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान माध्यमांसमोर आले. राज्यातील शांततेसाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषण करणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठ दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे आता शिवराज सिंह चौहानांनी उपोषणाचा मार्ग स्वीकाराला आहे.मध्य प्रदेशात सलग चौथ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक गाड्या जाळल्या, तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.दरम्यान मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर भाजपकडून काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यातच काँग्रेस नेत्यांच्या भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ समोर आल्याने भाजपच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही मध्य प्रदेशातील मंदसौरला आले होते. मात्र पोलिसांनी त्यांना राजस्थानच्या सीमेवर अडवलं. त्यानंतर राहुल गांधी पोलिसांना गुंगारा देऊन दुचाकीवर मध्य प्रदेशच्या दिशेने रवाना झाले. मात्र पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतलं.