शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Girl bitten by dogs:4 वर्षीय चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 16:09 IST

Girl bitten by dogs: या घटनेची दखल घेत मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे.

भोपाळ:मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये रस्त्यावरील आवारा कुत्र्यांनी एका 4 वर्षीय चिमुकलीच्या अंगाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील बागसेवानिया येथील अंजली विहार फेज-2 मध्ये ही घटना घडली. ही घटना शनिवारी घडली असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं?मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील भोपाळमधील कपर्ड कॅम्पसमधील एका इमारतीत मजूर म्हणून काम करतात. या इमारतीजवळ मुलगी खेळत होती. यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला केला. तिच्या अंगाचे लचके या कुत्र्यांनी तोडले. त्या कुत्र्यांच्या हल्ल्यासमोर चिमुकली काहीच करू शकली नाही. काही सेकंदानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने कुत्र्यांना दगड मारुन हकलले. सुदैवाने या हल्ल्यात चिमुकलीचा जीव वाचला, पण तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या दात आणि नखांच्या खोल जखमा झाल्या आहेत.

पाहा व्हिडिओ:-

मानवाधिकार आयोगाने घेतली दखलया घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या या जखमी मुलीवर हमीदीया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगाने भोपाळ महानगरपालिका आयुक्त आणि भोपाळ जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून येत्या सात दिवसांत उत्तर मागितले आहे. आयोगाच्या वतीने, महापालिका आणि आयुक्त भोपाळ यांना या मुद्यांवर तपशीलवार माहिती देण्यास सांगितले आहे.

लाखो रुपये खर्चूनही परिस्थिती जैसैथेभोपाळच्या बहुतांश भागात भटक्या कुत्र्यांची भीती आहे. भटक्या कुत्र्यांना हटवण्यासाठी भोपाळ महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. पण, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या भयानक व्हिडिओने सर्वांनाच धक्का बसला आहे. हा व्हिडिओ समोर येताच भोपाल महानगरपालिकेचा भोंगळा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशdogकुत्राbhopal-pcभोपाळ