शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

एम एफ हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात पडून, आता होणार लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:59 IST

M. F. Husain : भारतातील प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांची २५ चित्रे १७ वर्षांनंतर बँकेच्या तिजोरीतून बाहेर येणार आहेत.

M. F. Husain : 'पद्मश्री', 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' सारखे पुरस्कार मिळालेले भारतातील सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक असलेल्या एम.एफ. हुसेन यांच्या २५ चित्रांचा लिलाव होणार आहे. विशेष म्हणजे, ही चित्रे १७ वर्षांपासून बँकेच्या तिजोरीत धूळ खात होती. ही चित्रे १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरशी, २३५ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याशी आणि अगदी सीबीआय चौकशीशीही संबंधित आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जेव्हा बँकेची तिजोरी उघडण्यात आली, तेव्हा एम.एफ. हुसेन यांच्या या चित्रांसह अनेक कथाही बाहेर आल्या.

एम.एफ. हुसेन यांची ही २५ चित्रे गेल्या १७ वर्षांपासून मुंबईतील एका खाजगी बँकेच्या तिजोरीत ठेवण्यात आली होती. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, आता १२ जून रोजी हॅमिल्टन हाउस येथे या चित्रांपैकी एक ‘M. F. Husain : An Artist’s Vision of XX Century’ या चित्राचा लिलाव होत आहे. हा लिलाव पांडोल आर्ट गॅलरीद्वारे केला जाईल. 

१०० चित्रांच्या संग्रहाचा भागएम. एफ. हुसेन यांची ही २५ चित्रे त्यांच्या १०० चित्रांच्या संग्रहाचा भाग आहेत. एम. एफ. हुसेन यांनी ‘Our Planet Called Earth’ (OPEC) नावाच्या १०० चित्रांच्या मालिकेची योजना आखली होती. २००४ मध्ये त्यांनी यातील २५ चित्रे मुंबईतीलकला संग्राहक स्वरूप श्रीवास्तव यांना विकली. ही चित्रे एम. एफ. हुसेन यांनी १०० कोटी रुपयांना दिलेल्या १०० चित्रांच्या ऑर्डरचा भाग होती. पण इथेच एक ट्विस्ट आला.

२००६ मध्ये सीबीआयने स्वरूप श्रीवास्तव यांच्याविरुद्ध २३५ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू केली. हे कर्ज लोहखनिजाच्या आयातीसाठी घेण्यात आले होते, ज्यामध्ये १५० कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर करण्यात आला होता. यानंतर डिसेंबर २००८ मध्ये स्वरूप ग्रुपची १०४.२५ कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये या २५ चित्रांचाही समावेश होता.

बँकेच्या तिजोरीपासून लिलावापर्यंतचा प्रवास२००८ पासून एम. एफ. हुसेन यांची ही चित्रे बँकेच्या तिजोरीत पडून होती. स्वरूप श्रीवास्तव यांच्या प्रकरणात दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर हुसेन यांच्या या चित्रांना २ मे २०२४ रोजी न्याय मिळाला. स्वरूप श्रीवास्तव यांनी कर्जाचा काही भाग भरला, तरीही व्याज आणि उशिरा देयके इत्यादींसह उर्वरित रक्कम ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.

जेव्हा प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचली, तेव्हा न्यायालयाने पांडोल आर्ट गॅलरीला या २५ चित्रांचे मूल्यांकन करण्यास सांगितले. २ मे २०२४ रोजी, गॅलरीने न्यायालयाला सांगितले की, हुसेन यांच्या या चित्रांचे मूल्यांकन सुमारे २५ कोटी रुपये असू शकते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाने या चित्रांचा लिलाव करण्याचे आदेश दिले, ज्यासाठी १७ मे २०२५ रोजी स्वरूप ग्रुपने २५ कोटी रुपयांना खरेदी करण्याची ऑफर दिली.

परंतु कर्ज देणाऱ्या नाफेडने न्यायालयाला या चित्रांचा खुला लिलाव करण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांना चांगली किंमत मिळेल. अशाप्रकारे, कोट्यवधी रुपयांच्या या चित्रांचा आता लिलाव होणार आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबईbankबँकartकला