लॉनला पार्किंगची सोयच नाही ९ लाख रुपयांचा दंड
By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST
नागपूर : मानेवाडा रिंग रोडवर पार्किंग नसलेले लॉन संचालित करणाऱ्या मालकांवर ९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रंजना स्मृती आणि स्वाती लॉन संचालकांनी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासची मंजुरी न घेताच लॉन समारंभांसाठी भाड्याने देणे सुरू केले होते. समारंभात येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्थाही नव्हती. येणारे नागरिक लॉनबाहेरच आपली वाहने ...
लॉनला पार्किंगची सोयच नाही ९ लाख रुपयांचा दंड
नागपूर : मानेवाडा रिंग रोडवर पार्किंग नसलेले लॉन संचालित करणाऱ्या मालकांवर ९ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार रंजना स्मृती आणि स्वाती लॉन संचालकांनी महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासची मंजुरी न घेताच लॉन समारंभांसाठी भाड्याने देणे सुरू केले होते. समारंभात येणाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्थाही नव्हती. येणारे नागरिक लॉनबाहेरच आपली वाहने पार्क करीत होते. त्यामुळे मानेवाडा रिंग रोडवरील वाहतूक प्रभावित होऊ लागली. त्यामुळे अपघातसुद्धा होऊ लागले होते. अशा परिस्थितीत काही लोकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. तसेच वाहतूक विभागानेसुद्धा नासुप्रला कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले होते. शेवटी लॉनच्या विरोधात कारवाई करण्यात आली. त्यानंतर लॉन संचालकांवर आर्थिक दंडही ठोठण्यात आला. ही कारवाई वसंत कन्हेरे व पोलीस दलाने केली.