शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणातील लुखी गावात होते फक्त शिक्षणाची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:07 IST

हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील लुखी गावामध्ये मुलींचा सन्मान करणाऱ्या आगळ्या परंपरा पाळल्या जातात.

बलवंत तक्षक चंदीगड : हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील लुखी गावामध्ये मुलींचा सन्मान करणाऱ्या आगळ्या परंपरा पाळल्या जातात. या गावात शिक्षणाची पूजा होते. तिथे कोणत्याही देवी-देवतेचे एकही मंदिर नाही. मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलांच्या जन्मावेळी करतात, तसे विहीरपूजन केले जाते. येथील गावकरी जातिवाचक आडनावे लावत नाहीत.विवाहाच्या वेळी कुटुंबातील कोणताही सदस्य पुरोहित बनतो. या गावातील मुलींनी विविध क्षेत्रांत यश मिळविले आहे. देशांतील इतर गावांसाठी लुखी हे आदर्श उदाहरण आहे. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या या गावात दर तिसºया घरातील मुलगी सरकारी नोकरीत आहे. अशा ४०० मुली असून, त्यातील ३२५ जणी शिक्षिका आहेत.स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत लुखी गावातील मुलींना शिक्षण घेण्यास बंदी होती. गावकऱ्यांपैकी जे कोणी आपल्या मुलीला शिकविण्याचा प्रयत्न करीत, त्यांना पंचायतीसमोर माफी मागावी लागत असे. अशा वेळी सोहनलाल यादव या सुशिक्षित गृहस्थाचे या गावात आगमन झाले. यादव यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरू केली.लुखीच्या गावकºयांनी प्रारंभी विरोध केला, तेव्हा यादव यांनी आपल्या कुटुंबातील मुलींना शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतरही चार वर्षांपर्यंत गावकºयांचा विरोध कायम होता.पंजाबपासून वेगळे झाल्यानंतर १९६६ साली हरयाणा नव्या राज्याच्या रूपाने भारताच्या नकाशावर झळकले. तिथे शिक्षण खात्याने सुरू केलेल्या भरतीत लुखी गावातील अनेक युवकांची शिक्षकपदी नियुक्तीझाली.त्यामध्ये तेथील दोन महिलांचा समावेश होता. त्यानंतर हरयाणामध्ये जेव्हा शिक्षकांची भरती होते, त्यामध्ये लुखी गावातील महिला निश्चितच असतात.>लग्नातही शिक्षकाला पसंतीलुखी गावचे सरपंच चंद्रहास यांनी सांगितले की, आमच्या गावातील लोक आडनावात जातीचा उल्लेख न करता नावापुढे सिंह किंवा कुमार, असे शब्द वापरतात. एखाद्या मुलाचे लग्न ठरते, त्यावेळी गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती व सर्वात कमी वयाचे बालक, अशा दोघांच्या वतीने १०-१० रुपये भेट म्हणून त्या मुलाला दिले जातात. लुखी गावातील सेवानिवृत्त जिल्हा शिक्षण अधिकारी सुविधा यादव यांनी सांगितले की, येथील मुलगा-मुलगी विवाह ठरविताना प्राथमिक शिक्षक असलेल्या स्थळाला पहिली पसंती देतात.