शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

लोया प्रकरण सुनावणीत जोरदार शब्दिक खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:55 IST

मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच्या याचिकांवरील सुनावणीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांची याचिकाकर्त्याच्या वकिलाशी आणि वकिलांची आपसात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच्या याचिकांवरील सुनावणीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांची याचिकाकर्त्याच्या वकिलाशी आणि वकिलांची आपसात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.ही वादावादी सुरु असताना प्रामुख्याने न्या. चंद्रचूड हेच बोलत होते व सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा व न्या. अजय खानविलकर शांत होते. एका टप्प्याला न्या. चंद्रचूड यांनी, ‘आवाज चढवून तुम्ही आम्हाला गप्प बसवू शकत नाही’, असे ज्येष्ठ वकील दुश्यंत दवे यांना सुनावले. नंतर याचिकाकर्त्यांचे वकील आपसात आरोप-प्रत्यारोप करू लागले तेव्हा न्या. चंद्रचूड यांनी न्यायदालनाच्या भिंतींवर लावलेल्या न्या. एम. एच. कणिया आणि न्या. बी. के. मुखर्जी यांच्या रंगचित्रांकडे पाहात ‘निदान यांच्यासमोर तरी अदबीने वागा’ असे सुनविले. वकिलांमधील आपसातील वादावादी पाहून न्या. चंद्रचूड यांनी ‘मासळी बाजार तरी यापेक्षा बरा!’, असाही शेरा मारला.सत्य बाहेर येऊ नये यासाठी आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो आहे, असा आरोप ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएसन’चे वकील दवे यांनी केला आणि आपली वकिलीची सनद काढून घेण्याच्या बार कौन्सिलच्या कथित हालचाली सुरू असल्याचा उल्लेख केला. आपल्याला न्याय मिळेल असे वाटत नाही. न्यायाधीशांनी विवेकबुद्धीला स्मरून प्रकरण ऐकायला हवे, असे दवे म्हणाले. त्यावर न्या. चंद्रचूड यांनी त्यांना, विवेकाने कसे वागायचे ते आम्हाला शिकवू नका, आम्ही प्रत्येक गोष्ट निष्पक्षतेने तपासून पाहू, याची खात्री बाळगा, असे सुनावले.दुसरे याचिकाकर्ते पत्रकार बंधुराज लोणे यांचे ज्येष्ठ वकील पल्लव सिसोदिया यांनी लॉयर्स असोसिएशनच्या याचिकेमुळे या प्रकरणास निष्कारण वेगळे वळण लागून विषय भलतीकडेच नेलाजात आहे, असे प्रतिपादन केले.यावर अ‍ॅड. दवे यांनी, तुम्ही केसला सुरुंग लावताय, असा सिसोदिया यांच्यावर आरोप केला.त्यावर संतापलेल्या सिसोदिया यांनी, तुम्हाला काय वाटते याची आम्हाला पर्वा नाही. यानंतर सिसोदिया यांनी काही आक्षेपार्ह शब्दही वापरले. परंतु न्या. चंद्रचूड यांनी भानावर आणल्यावर सिसोदिया यांनी दिलगिरी व्यक्त केली. या शब्दिक खडाजंगीमध्ये दवे मध्येच महाराष्ट्र सरकारतर्फे काम पाहणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यावरही घसरले. साळवे अमित शहा यांना वाचविण्याचे काम करीत आहेत, असा त्यांनी आरोप केला.अमित शहा स्वत:ची काळजी घ्यायला समर्थ आहेत, असा प्रतिटोला सिसोदिया यांनी यावेळी लगावला. साळवे मात्र या दोघांमध्ये न पडतान्या. चंद्रचूड यांना उद्देशून म्हणाले की, न्यायाधीश महाराज स्वत: सौजन्याने वागले तरच इतर सौजन्याने वागतात, हेच खरे!>सुनावणी ९ फेब्रुवारीलातिसºया याचिकाकर्त्या तेहसीन पूनावाला यांचे ज्येष्ठ वकील व्ही. गिरी यांनी लोया मृत्यूची राज्य सीआयडीने केलेला तपास ही निव्वळ आरामखुर्चीत बसून केलेली चौकशी होती, असे प्रतिपादन केले व न्यायालयास स्वतंत्र चौकशीचा आदेश देण्याची विनंती केली. याचिकांवरील पुढील सुनावणी ९ फेब्रुवारी रोजी होईल.

टॅग्स :Courtन्यायालय