नेसरीत उच्चदाबामुळे लाखोंचे नुकसान
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
मीटर, टीव्ही, फ्रीज जळाले
नेसरीत उच्चदाबामुळे लाखोंचे नुकसान
मीटर, टीव्ही, फ्रीज जळालेनेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील नेसरी-आजरा मार्गावरील दसरा चौकाजवळील अनेक घरांमध्ये अचानक विद्युत प्रवाहाचा दाब वाढल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी सहाच्या सुमारास विद्युत डांबावरील तारांमध्ये स्पर्श होऊन ठिणग्या उडाल्या व मोठा स्फोट झाला. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. काहींच्या घरचे मीटर पूर्णपणे जळाले. तर काहींच्या घरातील टीव्ही, फ्रीज, फ्लॅट सेव्हर बंद पडले. चालू असणारे बल्ब फुटून पडले व वायरिंगही जळाली आहे. विद्युत वितरण मंडळाने आमचे नुकसान भरून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी हा दोष शोधण्यात गर्क होते.