शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या बहाण्याने लुटमार

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

मारहाण : सोनसाखळी, मोबाईल लंपास : जरीपटक्यातील घटना

मारहाण : सोनसाखळी, मोबाईल लंपास : जरीपटक्यातील घटना
नागपूर : अपघाताच्या बहाण्याने वाद घालून लुटारूंनी अपघातग्रस्त कारमधील तरुणांना मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मोबाईल हिसकावून नेला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली.
निखील ओमप्रकाश मालपाणी (वय २३, रा. वर्धमान नगर) आणि त्याचा मित्र चेतन भिकुलाल मालू (वय २६, रा. शांतीनगर) हे दोघे गुरुवारी रात्री डनलप ढाबा येथे जेवायला गेले होते. रात्री १२ च्या सुमारास परत येताना त्यांची भरधाव स्विफ्ट कार (एमएच ४९/ यू ०७१२) अनियंत्रित झाल्यामुळे कामठी मार्गावरील पीडब्ल्यूएस कॉलेजसमोरच्या डिव्हायडरवर धडकली. वेग जास्त असल्यामुळे डिव्हायडरवर कार उलटी झाली. जोरदार आवाज झाल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावली आणि कारमधून निखील तसेच चेतनला बाहेर काढले. या दोघांना कोणतीही दुखापत झाली नव्हती. दरम्यान, तेथे चार आरोपी आले. त्यांनी निखील तसेच चेतनशी वाद घातला. तुमच्यामुळे आमच्या मित्राला अपघात झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून ५० हजार रुपये खर्च आहे, असे म्हणत पैशाची मागणी करू लागले. निखीलने पोलिसांना फोन केला, त्यांना येऊ द्या, असे म्हटले असता आरोपींनी या दोघांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच मोबाईल असा एकूण १ लाख, ३० हजारांचा ऐवज हिसकावून नेला. निखीलने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----