शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"पहा, लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे", तेजस्वी यांचे ट्विट

By admin | Updated: July 13, 2017 17:23 IST

भ्रष्ट्राचाराच्या आरोपात सापडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटना, दि. 13 -  भ्रष्ट्राचाराच्या आरोपात सापडलेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला आहे.
बुधवारी तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. याला उत्तर देण्यासाठी तेजस्वी यादव यांनी ट्विटवर हा व्हिडिओ अपलोड केला असून "पहा, बिहारमध्ये लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे." असे लिहिले आहे. 
याचबरोबर, तेजस्वी यादव यांनी अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये असे दाखविण्यात आले आहे की, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे सचिवालयाच्या परिसरात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना मारहाण करत आहेत. तसेच, यामध्ये तेजस्वी यादव यांच्या डोक्याला माईक लागून जखम झाल्याचे आणि शेवटच्या टप्प्यात एका पोलिसाच्या डोक्यात एक प्रतिनिधी रागाने  कॅमे-याने मारत असल्याचे दाखविण्यात आले आहे. 
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तेजस्वी यादव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीमुळे सध्या ते अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी बाहेर ताटकळत उभे होते. त्यामुळे तेजस्वी यादव सचिवालयातून बाहेर पडतात प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती मोठी गर्दी केली होती. त्यावेळी तेजस्वी यादव यांच्या सुरक्षारक्षकांनी एका कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या एका प्रतिनिधीला अक्षरश: धक्के मारून तेथून दूर केले. साहजिकच या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रचंड संतापले होते. 
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे  अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या परिवाराविरोधात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून सीबीआयने कारवाई केल्यापासून बिहारमधील महाआघाडीला हादरे बसू लागले आहेत. आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तेजस्वी यादव यांच्या भवितव्याबाबत राष्ट्रीय जनता दलाने पुढील चार दिवसांत निर्णय घ्यावा, असे अल्टिमेटम नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाला दिला होता.