शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात लांब बोगदा काश्मीरमध्ये!

By admin | Updated: July 14, 2015 03:17 IST

देशातीलच नव्हे, तर दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे जम्मू ते श्रीनगर हे २९३ कि.मी.चे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे.

- रघुनाथ पांडे, उधमपूर (जम्मू)देशातीलच नव्हे, तर दक्षिण पूर्व आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून, यामुळे जम्मू ते श्रीनगर हे २९३ कि.मी.चे अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. मार्च महिन्यात याचे लोकार्पण होईल. आणखी १४ किलोमीटरचा नियोजित जोजीला बोगदा पूर्ण झाल्यास हे अंतर तब्बल ९० कि.मी.ने कमी होईल. उधमपूरपासून ४० किलोमीटर अंतरावरील नाथा टॉप या कणखर दगडी डोंगराच्या पोटात अकराशे मीटर खोल असलेल्या ९ किलोमीटर लांबीच्या या बोगद्याची साडेचार किलोमीटरची दोन टोके मधोमध सांधणारा अखेरचा सुरुंग स्फोट सोमवारी दुपारी करण्यात आला. जमिनीला प्रचंड हादरे देत दोन डोंगरांना जोडलेली अडीच मीटर जाडीची दगडी दरड कोसळली व क्षणात हा बोगदा सलग झाला. हा स्फोट केल्यानंतर १० तासांचा जम्मू- श्रीनगर प्रवास साडेतीन तासांवर आणण्याचा निर्धार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हिवाळ््यातील बर्फवृष्टी आणि पावसाळ््यातील धुवाधार अतिवृष्टीतून निर्विघ्न प्रवास साध्य करणारा हा बोगदा आधुनिक बांधकाम शैलीचा नमुना असल्याने पर्यटक तो बघण्यासाठी येतील, असे अनुमान आहे. श्रीनगरहून जम्मूकडे येताना वन-ए या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते; शिवाय वातारणातील अनेक समस्यामुळे वाहने अडून राहतात. या बोगद्यामुळे हे प्रकार टळू शकतील, असे गडकरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 2011 पासून काम सुरू27 लाख रुपयांची वार्षिक इंधन बचत अपेक्षित20 फुटांचा दुसरा बोगदा या बोगद्याला समांतर असून, त्यामधे वाहन व प्रवासी आपत्कालीन सुविधा 29 ठिकाणी हा बोगदा मुख्य बोगद्यासोबत जोडला असून तिथे बसविलेली स्वयंचलित यंत्रणा वाहन दुरुस्ती ते रु ग्णवाहिका अशा सर्व सुविधा पुरविणार आहे.3700 कोटी रुपयांचा प्रकल्प400 अभियंते आणि 2400 कामगार 3 शिफ्टमध्ये अहोरात्र कार्यरत.03 तास प्रवासाचे वाचतील.04 किलोमीटरचा बोगदा मागील वर्षभरात पूर्ण.03 वर्षात साडेपाच किलोमीटर बांधकाम झाले होते.