शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

लोकपाल समितीला हवी मुदतवाढ

By admin | Updated: July 19, 2015 23:36 IST

लोकपाल विधेयकासंबंधी संसदीय समितीला येत्या पावसाळी अधिवेशनात अहवाल सादर करणे अशक्य असल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ हवी आहे. गेल्यावर्षी

नवी दिल्ली : लोकपाल विधेयकासंबंधी संसदीय समितीला येत्या पावसाळी अधिवेशनात अहवाल सादर करणे अशक्य असल्यामुळे दुसऱ्यांदा मुदतवाढ हवी आहे. गेल्यावर्षी १८ डिसेंबरमध्ये लोकसभेत सादर करण्यात आलेले हे विधेयक अद्यापही रखडले आहे.लोकपाल, लोकायुक्त आणि इतर संबंधित कायद्याचा (सुधारणा) अभ्यास करण्यासाठी काँग्रेसचे खासदार ई.एम. नत्चिप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कार्मिक, तक्रार निवारण, कायदा व न्याय या विभागाची ३१ सदस्यीय संसदीय स्थायी समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला अहवाल सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत असली तरी महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या मुद्यावर अद्याप चर्चा व्हायची आहे. त्यामुळे समितीला पुन्हा मुदतवाढ मागणे अपरिहार्य बनले आहे. आम्ही राज्यसभेच्या सभापतींना आणखी मुदत मागण्यासाठी पत्र पाठविणार आहोत, असे नत्चिप्पन यांनी स्पष्ट केले. मुदतवाढ मिळाल्यास ती आणखी दुसरी मुदतवाढ ठरेल. यापूर्वी २५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. लोकसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा लोकपाल सदस्यांमध्ये समावेश करण्याचा मुद्दा प्रथमच उपस्थित झाला असून, त्या अनुषंगाने सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत.