शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आहे तशाच कायद्याने लोकपाल नेमता येईल : सर्वोच्च न्यायालयाचे मत

By admin | Updated: April 28, 2017 01:47 IST

संसदेने मंजूर केलेल्या लोकपाल कायद्यात सुधारणा न करताही लोकपालाची निवड व नियुक्ती करणे शक्य असल्याने

नवी दिल्ली: संसदेने मंजूर केलेल्या लोकपाल कायद्यात सुधारणा न करताही लोकपालाची निवड व नियुक्ती करणे शक्य असल्याने कायद्यातील त्रुटीचे कारण पुढे करत सरकारने ही नेमणूक टाळणे समर्थनीय नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.या नेमणुकीस विलंब होण्यासाठी सरकार देत असलेले कारण अमान्य करत न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या लोकसभेत कोणी विरोधी पक्षनेता नसल्याने ही नेमणूक अडली आहे, याच्याशी आम्ही सहमत नाही. लोकसभेतील विरोधी पक्ष नेता नसला तरी कायद्यानुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे इतर सदस्य लोकपालाची निवड करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले.लोकपाल कायदा मंजूर झाल्यानंतरच्या निवडणुकीत सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरलेल्या काँग्रेसला फक्त ४२ जागा मिळाल्याने विरोधीपक्षनेतेपद कोणालाच दिले गेले नाही. निवड समिती अपूर्ण असल्याने लोकपालांची नेमणूक करता येत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. लोकपाल लवकर नेमला जावा, अशी याचिका न्यायालयात आहे व आम्ही हा कायदा मृतावस्थेत राहू देऊ शकत नाही, असे म्हणून सरकारला लोकपाल लवकर नेमा असे सांगत आहे.