शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र - शिवराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:50 IST

लोकमत वृत्तपत्र दिवसेंदिवस प्रगती करत असून लोकमतच्या संस्थापकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळाली, असे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील म्हणाले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - लोकमत वृत्तपत्र दिवसेंदिवस प्रगती करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र आहे, असे माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील यांनी सांगितले. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते.

लोकमतच्या संस्थापकांसोबतही मला काम करण्याची संधी मिळाली आहे. लोकमत हे महाराष्ट्रात सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून यामध्ये छापून येणारा मजकूरही विश्वासार्ह आहे. कोणावरही विनाकारण टीका किंवा कोणाचीही स्तुती लोकमत वृत्तपत्रातून केली जात नाही. तसेच, टीव्ही मीडियासारखी ते एकांगी भूमिका मांडत नाही. मराठीसोबतच  हिंदी, इंग्रजी भाषेतूनही लोकमतचे वृत्तपत्र प्रसिद्ध होते, असे शिवराज पाटील म्हणाले. 

लोकमत संसदीय पुरस्कारप्राप्त खासदारांना देशाच्या विकासासाठी केलेल्या कामाचा बहुमान मिळाला आहे. तसेच, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सुद्धा योग्य प्रकारे स्वतःची जबाबदारी पार पाडली आहे. ब-याचदा  छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता आपण मोठ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. लोकमत संसदीय पुरस्कारसाठी मला बोलावल्याबद्दल लोकमत परिवार, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि त्यांच्या सहका-यांचा मी आभारी आहे. पुरस्कारप्राप्त खासदार अशाच प्रकारे स्वतःच्या कार्याचा गौरव करत राहतील, याची अपेक्षा आहे, असेही शिवराज पाटील यावेळी म्हणाले. 

भाजपाचे ज्येष्ठ नेते व लोकसभा सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि संयुक्त जनता दलाचे नेते व राज्यसभा सदस्य शरद यादव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून एन. के. प्रेमाचंद्रन (लोकसभा सदस्य) व सीताराम येचुरी (राज्यसभा सदस्य) यांना दिला गेलाय. सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू हा पुरस्कार सुश्मिता देव (लोकसभा) आणि जया बच्चन (राज्यसभा) यांना दिला गेला असून, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू या पुरस्काराने मीनाक्षी लेखी (लोकसभा) व रजनी पाटील (राज्यसभा) यांचा गौरव केला आहे.

लोकमतच्या या सोहळ्यास उपराष्ट्रपती अन्सारींव्यतिरिक्त माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी नगरविकासमंत्री व उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी व माजी लोकसभाध्यक्ष शिवराज पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, फारुख अब्दुल्ला, जया बच्चन हेसुद्धा उपस्थित होते.