शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘सूटबूट की सरकार’ म्हणत ‘लोकसभा’ जिंकली

By admin | Updated: April 20, 2015 23:53 IST

सुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीसुटी घालवून परतलेल्या राहुल गांधी यांचे आक्रमक रूप सोमवारी लोकसभेत बघायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गरिबांचा कैवारी कोण’ ही स्पर्धा सुरू केल्याचे पाहता राहुल यांनी लोकसभेचे सभागृह जिंकत निसटती का होईना बाजी मारली आहे. त्यांचे ‘सूट बूट की सरकार’ हे विधान लगेचच व्हायरल होऊन त्याची चर्चाही सुरू झाली.आपल्या २२ मिनिटांच्या सडेतोड भाषणात राहुल यांनी कधी किस्से तर कधी उपरोधिक टोलेबाजी केली. गरीब शेतकऱ्यांची किंमत चुकवत ‘सूट बूट की सरकार’ मोजक्या कॉर्पोरेट हाऊसची सेवा करीत आहे, असे त्यांनी म्हटले तेव्हा भाजपचे काही मंत्री सभागृहात अवाक्पणे बघत होते. मोदी सरकारवर कधी वैयक्तिक टीका करतानाही या मंत्र्यांनी आक्षेप घेण्याचे टाळले. उलट त्यांना बोलू द्या म्हणत संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी भाजपच्या खासदारांना शांत केले. आपली वेळ येईल तेव्हा उत्तर देऊ, असे म्हणत नायडूंनी त्यांची समजूत काढली.१८० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असे तज्ज्ञ सांगत असताना पंतप्रधान मोदी १०६ लाख हेक्टर तर कृषिमंत्री केवळ ८० लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे सांगत आहेत. खरे काय? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. त्यावर राधामोहनसिंग म्हणाले की, विविध राज्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अंदाज लावण्यात आला आहे. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या चर्चेतून ८० लाख हेक्टरचा आकडा मिळाला आहे.‘मन की बात’ऐवजी शेतकऱ्यांकडे जा मोदींनी गाजावाजा केलेल्या ‘मन की बात’वर उपरोधिक शेरा मारताना राहुल गांधी म्हणाले, पीडित शेतकऱ्यांशी ‘मन की बात’ करण्याऐवजी पंतप्रधान देशात फिरत का नाहीत. त्यावर भाजपच्या नेत्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.