मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू असताना कानळदा आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
By admin | Updated: April 29, 2016 00:29 IST
जळगाव : कानळदा ता.जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका पुष्पा सोनार यांना सरपंंच, त्यांचे पती व पुत्र यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या चौकशीसाठी गुरुवारी जि.प.तील अतिरिक्त आरोग्याधिकारी दिलीप पोटोळे हे आपल्या दोन सहकार्यांसोबत कानळदा येथील ग्रा.पं.मध्ये बसले होते. तेे संबंधितांचे जबाब घेत असतानाच कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला सरपंच पुत्र नीलेश भंगाळे व इतरांनी कुलूप लावले.
मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू असताना कानळदा आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप
जळगाव : कानळदा ता.जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका पुष्पा सोनार यांना सरपंंच, त्यांचे पती व पुत्र यांच्याकडून झालेल्या मारहाणीच्या चौकशीसाठी गुरुवारी जि.प.तील अतिरिक्त आरोग्याधिकारी दिलीप पोटोळे हे आपल्या दोन सहकार्यांसोबत कानळदा येथील ग्रा.पं.मध्ये बसले होते. तेे संबंधितांचे जबाब घेत असतानाच कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राला सरपंच पुत्र नीलेश भंगाळे व इतरांनी कुलूप लावले. आरोग्यसेविका सोनार यांना मारहाण केल्याने सरपंच प्रतिभा भंगाळे, त्यांचे पती विष्णू भंगाळे व पूत्र नीलेश भंगाळे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कार्यालयीन बाब म्हणून जि.प.च्या आरोग्य विभागानेही चौकशी हाती घेतली आहे. त्यासंबंधी दिलीप पोटोळे कानळदा येथे गेले होते. दोन्ही पक्ष म्हणाले, आम्हाला मारहाण झालीचौकशीसंबंधी पोटोळे यांनी आरोग्यसेविका सोनार यांचा जबाब घेतला. त्यात सोनार यांनी काहीएक कारण नसताना सरपंच, त्यांचे पती व पूत्र यांनी आपल्याला मारहाण केली. डोक्याला दुखापत झाली, असा जबाब दिला. तर आरोग्यसेविका सोनार यांनी आपल्याला मारहाण केली, असा जबाब सरपंच व त्यांच्या आरोपी असलेल्या कुटुंबीयांनी दिला. पेशेीवारांना उशीर आणि लागले कुलूपमारहाण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आरोग्य केंद्राला सरपंच यांचा पुत्र नीलेश भंगाळे व इतरांनी कुलूप लावले. आरोग्याधिकारी मुरलीधर पेशेीवार हे उशीरा आल्याने असा प्रकार केल्याचे ग्रामस्थ म्हणाले. दुसरे वैद्यकीय अधिकारी हे जि.प.त आयोजित कार्यशाळेला उपस्थित होते, असेे स्पष्टीकरण जि.प.चे जिल्हाआरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिले. या प्रकरणी आरोग्याधिकार्यांना विचारणा केेली आहे. तसेच कुलूप लावल्याच्या प्रकाराची चौकशी सुरू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.