शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन; पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपन्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:07 IST

सर्वोच्च न्यायालय : १२ जूनपर्यंत अभय

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात पूर्ण वेतन देण्याचे आदेश देणाºया केंद्र सरकारच्या २९ मार्चच्या परिपत्रकाचे उल्लंघन करणाºया कंपन्या व संस्थांवर दंडात्मक कारवाई करू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने १५ मे रोजी दिलेल्या स्थगनादेशास आज सर्वोच्च न्यायालयाने १२ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. याचाच अर्थ लॉकडाऊनच्या काळात पूर्ण वेतन न देणाºया कंपन्या व संस्थांवर सरकारला १२ जूनपर्यंत कोणतीही कारवाई करता येणार नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश काढला होता. श्रम व रोजगार सचिवांनीही राज्यांना पत्र पाठवून कोणालाही कामावरून न काढण्याचे आदेश दिले होते. गृहमंत्रालयाच्या २९ मार्च रोजीच्या आदेशाला आव्हान देणाºया अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना न्या. अशोक भूषण, न्या. एस.के. कौल आणि न्या. एम.आर. शाह यांच्या नेतृत्वाखालील पीठाने गृहमंत्रालयाच्या आदेशावर चिंता व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, कामगारांना वेतनाविना वाºयावर सोडले जाऊ नये, ही चिंता समजण्यासारखी आहे. तथापि, वेतन देण्यासाठी पैसेच नाहीत, अशी स्थितीही काही उद्योगांची असू शकते.

यात योग्य समन्वय साधणे आवश्यक आहे. कामगारांना वेतन मिळेल आणि उद्योगांचे हितही जोपासले जाईल, असा काही तरी मार्ग काढणे आवश्यक आहे. सरकार छोट्या उद्योगांना मदतीचा हात देऊ शकते. उद्योगांशी तसेच कामगारांशी चर्चा होणे आवश्यक आहे.केंद्र सरकारच्या वतीने अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये हा आदेश काढण्यात आला असून, तो वैध असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या