३० हजार रुपयांची दारू पकडली
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
(फोटो)
३० हजार रुपयांची दारू पकडली
(फोटो)चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडलीदोघांना अटक : २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भिवापूर : पोलिसांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चिखली शिवारात केलेल्या कारवाईमध्ये दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी दारूच्या ९६ बाटल्यांसह मोटरसायकल जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २४ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुशील शालिकराम शेंडे (२३) व गणेश रतीराम शेंडे (२५) दोघेही रा. नेरी, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानाही हे दोघेही दारूच्या बाटल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोटरसायकवर नेत असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भिवापूरपासून तीन कि.मी. अंतरावरील चिखली शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-३४/एस-६३५५ क्रमांकाच्या मोटरसायकलवर चंद्रपूरकडे जात असलेल्या या दोघांकडे एक पोते आढळून आले. या पोत्याची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या ९६ बाटल्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोघांनाही ताब्यात घेत दारूच्या बाटल्या आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये ४ हजार ८०० रुपये किमतीच्या दारूसह एकूण २४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ अ, ई अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हीर कारवाई ठाणेदार मनीष दिवटे, मारुती राऊत, सतीश फुटाने, सुधीर यादव आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)***