शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या भारतातील कारवायांवर प्रकाशझोत

By admin | Updated: September 16, 2015 01:55 IST

इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतात हातपाय पसरण्यासाठी चालविलेल्या हालचाली आणखी प्रकाशझोतात आल्या आहेत.

हैदराबाद : इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने भारतात हातपाय पसरण्यासाठी चालविलेल्या हालचाली आणखी प्रकाशझोतात आल्या आहेत. निष्पाप मुस्लीम तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून इसिसकडे आकर्षित करण्याची व त्यांना इसिसमध्ये भरती करून घेण्याचे काम केल्याची कबुली हैदराबादेत अटक झालेल्या अश्फा जबीनने दिली आहे. हा खुलासा होत असतानाच मंगळवारी पहाटे अबुधाबीवरून परतलेल्या चार युवकांना इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून तिरुवअनंतपुरम येथे अटक करण्यात आली. या चौघांची कसून चौकशी सुरू आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरळात अटक झालेल्या चार युवकांपैकी दोघे करीपूर विमानतळावर उतरले होते अन्य दोघे सकाळी तिरुवअनंतपुरमला पोहोचले होते. दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधांमुळेच या तरुणांना हद्दपार करण्यात आले होते असे समजते. इसिसचे जाळे वेगवेगळ््या राज्यांमध्ये कशा पद्धतीने फोफावते आहे, याचा नेमका अंदाज घेण्यात अश्फाची कबुली गुप्तचर यंत्रणांसाठी मोलाची ठरणार आहे. अश्फा जबीन तथा निकी जोसेफने आपल्या कार्यपद्धतीचा व त्यातून इसिससाठी केलेल्या भरतीबाबतचा पाढा पोलिसांपुढे वाचल्याचे कथितरीत्या समजते. सलमान मोईनुद्दीनच्या साथीने इसिससाठी सोशल नेटवर्किंगचा वापर कसा केला, याची साद्यंत कबुली वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या अश्फाने दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. इस्लाम विरुद्ध ख्रिश्चॅनिटी- फ्रेंडली डिस्कशन या नावाने तिने फेसबुकवर ग्रुप केला होता. त्या ग्रुपला फॉलो करणाऱ्यांची संख्या ५० हजारांच्या घरात पोहोचली होती. गेल्या वर्षी इसिसच्या संदर्भातील मजकुराच्या कारणास्तव हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. पण अश्फाने वेगळ््या नावाने ग्रुप करून हाच उद्योग सुरू ठेवल्याचेही तिच्या अटकेनंतर स्पष्ट झाले आहे. इसिसच्या सीरियातील कारवायांमागील हेतुने ती पुरती भारली गेली आहे. त्यातूनच तिने इसिसकडे भारतातील मुस्लिमांना आकृष्ट करण्याचे काम सुरू केले.