शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबारला देणार आठवडाभरात परवाने?

By admin | Updated: April 19, 2016 04:34 IST

सुधारित नियमावलीनुसार डान्सबारना परवाने देण्यासाठी ठरवून दिलेली मुदत संपून एक महिना उलटला तरी अद्याप परवाने न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला खडसावले.

नवी दिल्ली : सुधारित नियमावलीनुसार डान्सबारना परवाने देण्यासाठी ठरवून दिलेली मुदत संपून एक महिना उलटला तरी अद्याप परवाने न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला खडसावले. यानंतर राज्य सरकारने एक आठवड्यात परवाने देण्याचा नवा वादा केला. डान्सबार बंदीच्या राज्य सरकारच्या कायद्याला न्यायालयाने स्थगिती देऊनही सरकार डान्सबारना परवाने देण्यात चालढकल करीत असल्याने ‘इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’ थेट सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. न्या. दीपक मिश्रा व न्या. शिव कीर्ती सिंग यांच्या खंडपीठाने डान्सबार परवान्यांसाठी राज्य सरकारने घातलेल्या अटींपैकी काही अटींमध्ये २ मार्च रोजी सुधारणा केल्या होत्या. कोणतीही पळवाट न शोधता १५ मार्चपर्यंत पात्र अर्जदारांना परवाने दिले जावेत, असे न्यायालयाने त्या दिवशी बजावले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)युक्तिवादाच्या दरम्यान आदेशाचे पालन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत न्यायालयाने म्हटले की, डान्सबारमध्ये अश्लील नृत्ये होणार नाहीत आणि असे करण्यावर कायद्यानेही बंदी घातलेली आहे, हे आम्ही याआधीच स्पष्ट केलेले आहे. परंतु तरीदेखील राज्य सरकार अद्यापही अधिसूचित न झालेल्या नव्या कायद्याचाच संदर्भ देत आहे. याच नव्या कायद्याची सबब सांगत राज्य सरकार डान्सबारना परवाने देण्याच्या आपल्या आदेशाचे पालन करण्याचे टाळत आहे. परवाने जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हटविण्यात आलेसोमवारी हे प्रकरण पुन्हा सुनावणीस आले तेव्हा याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ वकील जयंत भूषण यांनी असे निदर्शनास आणले की, १५ मार्च रोजी केवळ दोन परवाने जारी करण्यात आले. परंतु लगेच १८ मार्चला हे परवाने मागे घेण्यात आले आणि परवाने जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हटविण्यात आले.राज्याच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी सांगितले की, डान्सबारसंबंधी विधिमंडळाने नवा कायदा केला आहे. त्या अनुषंगाने परवान्यांसाठी आलेल्या अर्जांवर प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एक आठवड्याची मुदत द्यावी.न्यायालयाने अंतिमत: ही विनंती मान्य केली व पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवली. त्या दिवशी परवाना अधिकारी असलेल्या पोलीस उपायुक्तांनी (मुख्यालय-१-हॉटेल विभाग) आदेशाचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन स्वत: न्यायालयात हजर राहावे, असाही आदेश दिला गेला.