शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांचं मदतीसाठी मोदींना पत्र

By admin | Updated: March 12, 2016 21:18 IST

बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १२ - बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. 300 कोटीहून जास्त थकबाकी मिळवण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. किंगफिशर एअरलाईन्स बंद पडल्याने 7 हजारापेक्षा जास्त कर्मचा-यांना फटका बसला आहे. त्यातील अनेक जणांची कायदेशीर लढाई लढण्याची ऐपतदेखील नाही. 
 
सरकार आणि विरोधकांमध्ये सुरु असेलल्या शाब्दिक लढाईत आमचा मुद्दा बाजूला पडत असल्याचं कर्मचा-यांनी पत्रात म्हटलं आहे. सरकार आणि विरोधक मल्ल्या देश सोडून गेले यावरच भांडत असल्याचं त्यांचं म्हणण आहे. आपले खासदार दोन्ही सभागृहात किंगफिशर एअरलाईन्सलचा मुद्दा उचलत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यातील एकजणही कर्मचा-यांच्या स्थितीवर बोलत नाही याच दुख: कर्मचा-यांनी व्यक्त केलं आहे. 
 
किंगफिशर एअरलाईन्सने कर चुकवले असताना आम्हालाही आयकर विभागाच्या नोटीसा मिळत आहेत. कर्मचा-यांचं संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा काहीच फायदा होत नाही आहे. आम्हाला मोदींवर तसंच या सरकारवर विश्वास आहे. आमची विनंती वाया जाणार नाही अशा विश्वास या कर्मचा-यांनी व्यक्त केला आहे.