शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चला, तिकीट-तिकीट खेळू या

By admin | Updated: September 18, 2015 02:33 IST

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली

राजकारणात निवडणुकीच्या तिकिटावरून होणारे वाद अथवा भांडणे आजवर सर्वांनी अनेकदा पाहिली. तथापि, दिवंगत नेत्यांच्या स्मृतीनिमित्त प्रकाशित टपालाच्या तिकिटावरून दोन राष्ट्रीय पक्षांमधे रंगलेला जाहीर वाद देशाच्या राजधानीत प्रथमच रंगला आहे.दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधींच्या सन्मानार्थ पूर्वी प्रकाशित झालेली टपाल तिकिटे रद्द करण्याच्या सरकारी निर्णयाचे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी जाहीर समर्थन केले. त्यामागील तर्क देताना प्रसाद म्हणाले, की आमचे सरकार कोणतीही विशिष्ट विचारसरणीचे अथवा व्यक्तींचे पूजक नाही. राष्ट्रनिर्मितीत ज्यांनी ज्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, त्या सर्वांच्या नावाची टपाल तिकिटे आम्ही प्रकाशित करणार आहोत. यापूर्वी एकाच कुटुंबातील व्यक्तींची टपाल तिकिटे वारंवार का प्रकाशित केली गेली? याचे उत्तर काँग्रेसनेच देशाला द्यावे. आमचे सरकार राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, तिलका मांझी, विद्यापती, मिथिला पेंटिंग, खुदिराम बोस, सुभाषचंद्र बोस, ईश्वरचंद्र विद्यासागर, मुन्शी प्रेमचंद, दीनदयाळ उपाध्याय, अशफाकउल्ला खान, रवींद्रनाथ टागोर, मौलाना आझाद, बिसमिल्ला खान, राममनोहर लोहिया, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, मदर तेरेसा, राणी लक्ष्मीबाई, चंद्रशेखर आझाद, महाराणा प्रताप यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी नजीकच्या काळात डाक तिकिटे जारी करणार आहे. रविशंकर प्रसाद यांच्या या तर्काला ठोस उत्तर देत गुरूवारच्या वार्तालापात प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले, राष्ट्रनिर्मितीत एकतर भाजपला दावा करता येईल असे या पक्षाचे विशेष योगदान नाही. केवळ काँग्रेसच्या आकसापोटी सपशेल खोटी विधाने करून मंत्रीमहोदय देशाची फसवणूक करीत आहेत. काँग्रेसने कोणत्याही काळात विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार केला नाही की केवळ एकाच कुटुंबातील व्यक्तिंची डाक तिकिटे प्रकाशित केली नाहीत. उलटपक्षी आपल्या राजकीय विरोधकांचा यथोचित सन्मान करण्याची परंपरा काँग्रेसनेच देशात रूजवली आहे. आपल्या निवेदनाच्या पुष्ठ्यर्थ काँग्रेस सरकारच्या सत्तेच्या कालखंडात भारत सरकारतर्फे कोणत्या राष्ट्रनेत्यांची डाक तिकीटे जारी करण्यात आली, त्याची १९४८ पासून २00९ पर्यंतची लांबलचक नावांसह यादीच सुरजेवालांनी वार्तालापात जारी केली. त्यात महात्मा गांधी, (१९४८)लोकमान्य टिळक (१९५६), मदनमोहन मालवीय (१९६१), सुभाषचंद्र बोस(१९६४), सरदार पटेल (१९६५), डॉ.आंबेडकर(१९६७), महाराणा प्रताप(१९६७), स्वातंत्र्यवीर सावरकर(१९७0), लेनीन(१९७0), जयप्रकाश नारायण(१९७९), शिख नेते बाबा जस्सासिंग अहलुवालिया (१९८५), मास्टर तारासिंग(१९८५), शेख अब्दुल्ला (१९८८), राजनारायण(२00५), मदर तेरेसा, जे.आर.डी.टाटा(२00८) , रामस्वामी पेरियार(२00९), डॉ.सी.व्ही.रामन (२00९) इत्यादी प्रमुख नावे आहेत. संचार मंत्री प्रसाद यांनी जाहीर केलेल्या यादीत यापैकी काही नावांची पुनरावृत्ती झालेली दिसते आहे. जगाच्या पाठीवर बल्गेरिया, सोव्हिएत रशिया, लाओस, जर्मनी, श्रीलंका, बुरंडी सारख्या अनेक लहान-मोठया देशांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची टपाल तिकिटे प्रकाशित केली आहेत. आपले अस्वस्थ संचारमंत्री त्यांनाही ती बंद करायला सांगणार काय? असा सवालही सुरजेवालांनी विचारला आहे.- काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला म्हणाले, की स्वातंत्र्यवीर सावरकर, जयप्रकाश नारायण, राजनारायण यांसारख्या आपल्या राजकीय विरोधकांची टपाल तिकिटे तर काँग्रेसने जारी केलीच, याखेरीज वाजपेयी सरकारने आपल्या कार्यकालात संघाचे संस्थापक हेडगेवार, नंबुद्रीपाद, आदींची तिकिटे प्रकाशित केली. त्यानंतर काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत ती रद्द करण्याचे पाप कधी केले नाही.