शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

RSS स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवनागी द्या, भाजपा नेत्याची मागणी

By admin | Updated: October 18, 2016 13:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते एस सुरेश कुमार यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 18 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपा ज्येष्ठ नेते एस सुरेश कुमार यांनी केली आहे. आरएसएस स्वयंसेवक   रुद्रेशच्या हत्येविरोधात शिवाजीनगर परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना एस सुरेश कुमार यांनी 'जर आरएसएस स्वयंसेवकांना सुरक्षा देणं पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणी केली आहे.
 
'आरएसएस स्वयंसेवक कुट्टप्पा, प्रवीण पुजारी, राजू आणि रुद्रेश यांच्या झालेल्या हत्यांवरुन पोलीस आपल्याला सुरक्षा देण्यात असक्षम आहेत हे सिद्ध होत आहे,' असं एस सुरेश कुमार बोलले आहेत. 'आम्ही पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेसाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केल्याचंही,' त्यांनी सांगितलं आहे. 
 
या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी स्पष्टीकरण मागितल्यानंतर 'आम्ही पीडित नसून योद्धे आहोत. आपली सुरक्षा कशी करावी आम्हाला माहित आहे,' असं उत्तर एस सुरेश कुमार यांनी दिलं. आरएसएस आणि ज्येष्ठ भाजपा नेत्यांनी मात्र या वक्तव्याला पाठिंबा दिलेला नाही. 
 
आरोपींविरोधात कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप एस सुरेश कुमार यांनी केला आहे. 'तर हा सगळा कट असल्याचं,' ज्येष्ठ भाजपा नेत्या शोभा यांनी म्हटलं आहे. एस सुरेश कुमार यांच्या वक्तव्याशी फारकत घेत आरएसएसने आम्हाला पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करु असंही आरएसएसने सांगितलं आहे.