शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मलाही सांगायचय संस्थानकालीन घाटाचा विकास व्हावा

By admin | Updated: December 20, 2015 23:59 IST

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रक

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रकारची सोय नाही. या घाटावर शहरातील सांडपाणी केरकचरा जाऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. घाणीमुळे घाटाच्या पायर्‍या गाडल्या गेल्या आहेत. संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी गवतही मोठ्या प्रमाणात उगवले आहे. संरक्षक कठड्यांचा अभाव, वीज व्यवस्था, बसण्याचीही या ठिकाणी सोय नाही.
काही वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्याने घाटाला गतवैभव प्राप्त झाले होते. मात्र, शहरातील नागरिक व नगरपलिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावर संरक्षक कठडे, विजेची तसेच बसण्याची सोय केल्यास व घाट स्वच्छ करून, नीरा नदीतून वाहणार्‍या पाण्यात नौका विहाराची सुविधा करून पर्यटनदृष्ट्या चालना दिल्यास अनेक नागरिक, आबालवृद्ध याचा फायदा होणार आहे. यामुळे लोकांची सोय होईल तर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या संस्थान कालीन घाटाला गतवैभव प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करून काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य होणार आहे.
ज्ञानेश्वर सावंत-
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ