शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबुडवे उद्योग सीबीआयच्या रडारवर

By admin | Updated: April 16, 2015 23:44 IST

सार्वजनिक बँकांकडून अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊन ते स्वेच्छेने बुडविणाऱ्यांच्या श्रेणीत मोडणाऱ्या बड्या उद्योग समूहांची आता खैर नाही.

नबीन सिन्हा - नवी दिल्लीसार्वजनिक बँकांकडून अव्वाच्या सव्वा कर्ज घेऊन ते स्वेच्छेने बुडविणाऱ्यांच्या श्रेणीत मोडणाऱ्या बड्या उद्योग समूहांची आता खैर नाही. अर्थमंत्रालयाने अशा कंपन्यांचा सीबीआयकडून तपास करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.मोठ्या प्रमाणातील कर्ज बुडविणाऱ्या कंपन्यांवर सीबीआयला थेट कारवाई करता यावी यासाठी दिल्ली पोलीस स्थापना कायद्यात (डीएसपीई) योग्य सुधारणा करण्याची मागणी सीबीआयने केली होती. अर्थमंत्रालयातील वित्त सेवा किंवा बँकिंग विभागानेही त्यासाठी सुधारणा निश्चित केल्या आहेत. अशा कंपन्यांना यापुढे कर्ज न देण्याचा मार्गही अवलंबला जाईल. अधिकाऱ्यांशी चर्चाबँकिंग आणि कर्ज घोटाळा विभागाकडून ही प्रकरणे लावून धरली जातील, असे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तांत्रिक आधारावर योग्यरीत्या तपास व्हावा. बुडीत कर्जात फरक केला जावा, यासाठी सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी महसूल सेवा आणि बँकिंग अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. सीबीआयने जानेवारी २०१४ पासून सोपविण्यात आलेल्या प्रकरणांची छाननीही केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुडणाऱ्या कर्जात लक्षणीय वाढ अनुत्पादक संपत्ती (एनपीए) किंवा बुडीत कर्जाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये असे कर्ज ८० हजार कोटी रुपये होते, ते डिसेंबर २०१४ मध्ये २.६० ते २.७५ लाख कोटीपर्यंत गेले आहे. कर्ज बुडविणाऱ्या कंपन्यांबाबत माहितीचे आदान-प्रदान वेगाने व्हावे, तपासात सक्तवसुली संचालनालयासारख्या (ईडी) संस्थांना सहभागी करवून घेतले जावे, असे अर्थमंत्रालयाला वाटते. त्यासाठी मंत्रालय आग्रही आहे.४आयडीबीआयने किंगफिशर एअरलाईनला ७५०० कोटींच्या कर्जाला मंजुरी दिली असून एसबीआयसारख्या कन्सोर्टियमचा त्यात समावेश आहे. एवढे मोठे कर्ज देण्यात आल्याबद्दल सीबीआयला किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या यांचा आतापर्यंत तपास करता आला नव्हता. हे एक उदाहरण असून आणखी काही प्रकरणांचा तपास होऊ शकतो, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. ४भूषण स्टीलचे मालक नीरज सिंघल यांना सिंडिकेट बँकेचे सीएमडी एस.के. जैन यांच्यासह लाच प्रकरणात अटक झाली होती. ते सध्या जामिनावर मोकळे आहेत. त्यांच्याविरुद्धचा तपास सौम्य केला जावा यासाठी अनेक बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहेत. ४या कंपनीकडे ४० हजार कोटींचे कर्ज थकीत असून व्यवस्थापनाने कर्जाचे हप्ते देण्याला असमर्थता दर्शविली असल्याचे सूत्रांनी म्हटले.