व्यंकटेश केसरी / नवी दिल्लीनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळविलेल्या उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विधिमंडळ पक्ष नेता निवडण्यास काँग्रेस उशीर करत आहे. उत्तराखंडमधील नेत्यांनी नेता निवडीचा हा निर्णय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सोपविला आहे. तर, उत्तरप्रदेशमधील नेत्यांनाही याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. उत्तराखंडमधील प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय याबाबत बोलताना म्हणाले की, राज्यात नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी नेता निवडीचा अधिकार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिला आहे. पक्षांतर्गत संघर्ष आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांची कार्यपद्धतीमुळे पक्षाचा उत्तराखंडमध्ये पराभव झाल्याचे बोलले जात आहे. उत्तरप्रदेशात २५ वर्षांपासून सतत पराभव होण्याचा प्रकारही वेगळा नाही. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश काँग्रेसमधील नेत्यांनी पराभवाबाबत दोषारोप देणे थांबविले आहे.
विधिमंडळ नेत्याची निवड नाही
By admin | Updated: March 27, 2017 04:08 IST