शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

काश्मीरच्या श्रीनगरमधील दल लेक म्हणजे पाण्यातल्या पर्यटनासाठी उत्तम ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 04:20 IST

सर्व बाजूंनी पाणी असावं, त्याच्या पलीकडे डोंगर, मध्येच एखादं टुमदार घर आणि आपण बोटीत बसलेलो आहोत. ही कल्पना कशी मस्त आहे नाही? पण अशी ठिकाणं अनेकदा आपल्याला माहीत नसतात.

श्रीनगर- सर्व बाजूंनी पाणी असावं, त्याच्या पलीकडे डोंगर, मध्येच एखादं टुमदार घर आणि आपण बोटीत बसलेलो आहोत. ही कल्पना कशी मस्त आहे नाही? पण अशी ठिकाणं अनेकदा आपल्याला माहीत नसतात. दोन महिन्यांनी डिसेंबरअखेरीस ख्रिस्मसच्या सुट्या लागतील. या काळात अनेक कुटुंबं देशात ठिकठिकाणी जात असतात. राजस्थान, काश्मीर, सिक्कीममध्ये गेल्यास तिथे बोटीतून मस्त फिरण्याचा आनंद घेता येतो.काश्मीरच्या श्रीनगरमधील दल लेक प्रख्यात आहे. अनेक जण श्रीनगरमध्ये जातात. दल लेकमध्ये असणाºया हाऊस बोटमध्ये राहण्याऐवजी हॉटेलमध्ये मुक्काम करतात. डिसेंबरात थंडी भरपूर असली आणि लेक गोठला असला तरी एखाद दिवस हाऊ सबोटमध्ये मुक्काम करता आल्यास चांगलाच अनुभव असेल.सिक्किममधील गुरूडोंगमार लेकही प्रसिद्ध आहे. राजधानी गंगटोकपासून १२0 किलोमीटरवर असलेला हा तलाव अवाढव्य आणि अतिशय सुंदर आहे. गुरू पद्मसंभव (तिबेटियन बौद्ध गुरू रिनपोचे) यांच्या नावाने तो ओळखला जातो. गुरू नानक यांनीही या तलावाला भेट दिली होती. बाजूने बर्फाच्छादित डोंगर आणि आपण पाण्यामध्ये बोटीतून विहार करीत आहोत, हे अनुभवायला हवं.अर्थात वरील दोन्ही ठिकाणी थंडीत गेल्यास अडचणी येतात. पण थंडी संपताच, मुलांच्या परीक्षा संपल्यावर जाता येईल.राजस्थानात उदयपूरचा पिछोला लेकही अतिशय छान आहे. हा कृत्रिम तलाव अतिशय मोठा आहे. शेजारीच पिछोली गाव असल्यानं १३६२ साली तयार करण्यात आलेल्या या तलावाला पिछोला लेक हे नाव पडलं. अतिशय शुद्ध पाणी आहे. तलावात चार बेटं आहेत. त्यातील एकावर जग मंदिर (राजवाडा), दुसºयावर जग निवास (राजवाडा) , तिसºयावर मोहन मंदिर (जेथून महाराजे बाहेरचं दृश्य पाहत) आणि चौथ्यावर आरसी विलास (शस्त्रास्त्रांचं आगार आणि राजवाडा) बांधले आहेत. शिवाय बाजूंनी डोंगर दिसत राहतात. तिथं बोटीत अवश्य पाहावं.केरळमध्ये पुकोड लेक नावाचा तलाव वायनाड जिल्ह्यात आहे. भारताच्या नकाशासारखा या तलावाचा आकार आहे. बोटीतून विहार करताना तलावात भरपूर कमळं दिसत राहतात. कोळीकोड (पूर्वीचं कालिकत) हून जेमतेम ६0 किलोमीटरवर हे ठिकाण आहे.केरळमध्ये गेलात आणि बॅकवॉटरमधील हाऊसबोटमध्ये एक दिवस मुक्काम केला नाही, तर त्या राज्यात जाण्याला अर्थच नाही. अळपुळ्ळा (पूर्वीचा अलप्पी) मधील बॅकवॉटर आणि त्या पाण्यात दिसणाºया शेकडो हाऊ सबोटी आपलं लक्ष वेधून घेतात. सकाळी त्या बोटीत बसायचं आणि दुसºया दिवशी बाहेर यायचं. बोटीतच दोन वेळचं जेवण, नाश्ता, चहा, वातानुकूलित बेडरुम्स, इंग्लिश टॉयलेट सारं काही असतं. जेवणात काय हवं आहे, हे आधी सांगून ठेवलं की तेही मिळतं. अन्यथा डोसा, इडली, भाताचे प्रकारच असतात.