शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नेत्याच्या सुरक्षारक्षकाने काढली छेड; महिलेचा मर्सिडीजवर हल्ला

By admin | Updated: May 20, 2015 02:38 IST

रविवारी संध्याकाळी २३ वर्षीय साध्वी पांडे आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून डॉक्टरांकडे निघाली होती. एका ट्रॅफिक सिग्नलवर ती थांबली.

आग्रा : रविवारी संध्याकाळी २३ वर्षीय साध्वी पांडे आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून डॉक्टरांकडे निघाली होती. एका ट्रॅफिक सिग्नलवर ती थांबली. समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते अभिनव शर्मा यांचा ताफा तिच्या शेजारी येऊन थांबला. शर्मा यांच्या सुरक्षा रक्षकाने कारमधून साध्वीची छेड काढणे सुरू केले. मग काय? साध्वी चांगलीच संतापली आणि थेट सपा नेत्याच्या मर्सिडीज कारच्या बोनटवर चढली व गाडीच्या काचा फोडूनच शांत झाली.आगऱ्यात ही घटना घडली. या घटनेचा दोन मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वाधिक शेअर केला गेला. सुरक्षा रक्षकाने छेड काढल्यानंतर साध्वी आपल्या मोबाईलमधून त्याचे फोटो घेऊ लागताच, शर्मा यांच्या ताफ्यातील अन्य सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कथितरीत्या तिचा मोबाईल हिसकावून तो तोडून टाकला. यामुळे साध्वी संतापली. यानंतर थेट शर्मा यांच्या गाडीच्या बोनटवर चढत तिने विंडशील्ड तोडले. गाडीवर लागलेला सपाचा ध्वजही तिने फाडला. घटना उजेडात येताच, मी कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे साध्वी म्हणाली. या घटनेनंतर अभिनव शर्मा पक्षाचे नेते नसल्याचा दावा समाजवादी पक्षाने केला. दरम्यान, शर्मा यांनी सुरक्षा रक्षकाची कामावरून हकालपट्टी केली आहे. (वृत्तसंस्था)सुरक्षा रक्षकाची हकालपट्टी या घटनेनंतर मी सुरक्षा रक्षकाला नोकरीवरून कमी केले आहे. सुरक्षा रक्षक तिची छेड काढत असल्याचे महिलेने मला सांगितले असते तर मी त्याची तिथेच खबर घेतली असती; पण मी काही बोलायच्या आतच महिलेने माझ्या गळ्यातील साखळी ओढली आणि गाडीचे नुकसान केले. अशा स्थितीत मी काय करणार होतो? असे अभिनव शर्मा यांनी सांगितले.कष्टाच्या पैशाने विकत घेतलेली तुमची एखादी वस्तू नाहक कुणी तोडत असेल तर कुठलाही सामान्य माणूस अशीच प्रतिक्रिया देईल. मोबाईल न तोडता त्यांनी सुरक्षा रक्षकाविरुद्ध कारवाई केली असती तर मी असे वागलेच नसते. मी खूप हिंमत दाखवली, असेही नाही, हेही साध्वीने स्पष्ट केले.