उंबरगे येथे साठवण तलाव खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:16 IST
सोपल यांची उपस्थिती : व्यापारी मित्रमंडळाने दिला एक लाखाचा निधी
उंबरगे येथे साठवण तलाव खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ
सोपल यांची उपस्थिती : व्यापारी मित्रमंडळाने दिला एक लाखाचा निधी बार्शी : तालुक्यातील उंबरगे येथे लोकसहभागातून सुरूअसलेल्या गावातील साठवण तलावाच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी मित्रमंडळाने दिलेल्या निधीतून करण्यात येणार्या कामाचा आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी आमदार सोपल यांच्या हस्ते व्यापारी मित्रमंडळाने दिलेला 1 लाख 101 रुपयांचा धनादेश सरपंच वालचंद मुंढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.उंबरगे येथे लोकसहभागातून गावातील साठवण तलावाच्या रुंदीकरण, खोलीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य अशोक सावळे, युवा नेते विक्रम सावळे, र्मचंट असो़चे अध्यक्ष तुकाराम माने, बाजार समितीचे संचालक दिलीप गांधी, व्यापारी मित्रमंडळाचे प्रवीण गायकवाड, संतोष बोरोड, अभिजित सोनिग्रा, ल़पा़ चे उपअभियंता एच़टी़ खरात, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अरुण अष्टुळ , सरपंच वालचंद मुंढे, उपसरपंच विलास जाधव, अरुण मुंढे आदी उपस्थित होत़े आमदार सोपल म्हणाले, गावाने शासन योजनेत सहभाग नसतानादेखील याअंतर्गत सुरू केलेली कामे इतर गावांसाठी आदर्शवत आहेत. व्यापारी मित्रमंडळाला येथील कामांची खात्री पटल्याने त्यांनी सामाजिक भान जपत दिलेली मदत मोलाची असल्याचे गौरवोद्गार काढले. या कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जनकराव जाधव, विक्रम सावळे, अभिजित सोनिग्रा, सरपंच वालचंद मुंढे, चित्रसेन गुळवे आदींची भाषणे झाली.व्यापारी महासंघाने दिलेल्या निधीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रवीण गायकवाड यांनी व्यापारी महासंघाच्या वतीने यंदा 20 प्राथमिक शाळा दत्तक घेऊन तेथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे सांगितले. यावेळी सचिन मडके, प्रशांत कथले, ग्रामविकास अधिकारी एस़बी़ खळदकर, संतोष बोराडे, आप्पा पाटील, अरुण मुंढे, शिवाजी हावळे, अरुण अडसूळ, राहुल मुंढे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गुणवंत विधाते यांनी केले.