शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

‘मृत्यू शब्द ऐकल्यावर ते हसत’

By admin | Updated: April 28, 2017 01:12 IST

वयाच्या २६/२७व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले.

विश्वास खोड / पुणे

वयाच्या २६/२७व्या वर्षी यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले. ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभूतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले. ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव आला आणि ते ओशोमय होऊन गेले.ऐन बहरात असलेली कारकिर्द सोडून विनोद खन्ना आचार्य रजनीश यांचे भक्त झाले. पुण्यातील ओशो आश्रमात १९७५ ते १९८१पर्यंत ते अगदी संन्याशाप्रमाणे राहात होते. माळीकामही करत होते. ओशो आश्रमातील विनोद खन्ना यांच्या सहकारी आणि ‘ओशो टाइम्स’च्या संपादक माँ अमृत साधना आठवणी सांगताना म्हणाल्या, ओशोंनी विनोद खन्ना यांना आश्रमातील खासगी उद्यानामध्ये माळीकाम करण्यास सांगितले. एका स्टारचा सारा अहंकार विसर्जित व्हावा, असा ओशोंचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला. एका लहानशा खोलीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्या खोलीमध्ये याआधी दोन संन्याशांचा मृत्यू झाला आहे, असे अन्य संन्यासी विनोद खन्ना यांना सांगत. ओशोंची मृत्यूविषयी जी शिकवण आहे, ती विनोद जगले. नंतर मृत्यू हा शब्द ऐकल्यावर विनोद खळखळून हसत असत. त्या म्हणाल्या, १९७५ ते १९८१ दरम्यान विनोद खन्ना ओशो आश्रमात होते. ‘स्वामी विनोद भारती’ असे त्यांचे नामकरण केले होते. त्यांना ध्यानधारणेत खूप रस होता. खूप प्रेमळ माणूस होता. सर्वांशी खेळीमेळीने राहात. त्यांना आश्रमातील लाइफ स्टाइल आवडत असे. ते आश्रम सोडून गेल्यानंतर परत आले नाहीत, मात्र अंतर्मनातून ते ओशोंच्या कायमच सान्निध्यात राहिले. विजय आनंद, महेश भट, सुभाष घई हेही त्याच वेळी आश्रमात येत असत. चित्रपटांची कामे आटोपून ही मंडळी आश्रमात राहण्यासाठी येत.माँ अमृत साधना म्हणाल्या, वयाच्या आठव्या वर्षापासूनच साधू, संन्यासी यांच्याविषयी विनोद यांना आकर्षण होते. पुढे ते ओशोंची प्रवचने ऐकू लागले. त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर असताना, वयाच्या २६/२७व्या वर्षी त्यांच्या घरात आई, बहीण यांचा लागोपाठ मृत्यू झाला. विनोद यांनाही मृत्यूचे भय वाटू लागले. ओशोंच्या प्रत्यक्ष भेटीच्या वेळी या विभूतीशी आपली अनेक जन्मांची ओळख आहे, असे त्यांना वाटले. ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव आला. आपल्या स्वत:च्या घरी परतल्यासारखे वाटले.