शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांना चार महिन्यांसाठी दिलासा ! पाणी वाढले : नागझरीतून पाणी उपसा सुरू

By admin | Updated: September 13, 2015 00:04 IST

आशपाक पठाण, लातूर : पाणीटंचाईने तहानलेल्या लातूरकरांना काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. मांजरा धरणातील पाणीसाठ्यात बर्‍यापैकी वाढ झाली असून, नागझरी बंधार्‍यातही पाणी आले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. लातूर शहराला मनपा पंधरा दिवसाला एकदा पाणी देणार असून, हे रोटेशन कायम ठेवल्यास जानेवारीपर्यंत दिलासा मिळणार आहे.

आशपाक पठाण, लातूर : पाणीटंचाईने तहानलेल्या लातूरकरांना काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. मांजरा धरणातील पाणीसाठ्यात बर्‍यापैकी वाढ झाली असून, नागझरी बंधार्‍यातही पाणी आले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. लातूर शहराला मनपा पंधरा दिवसाला एकदा पाणी देणार असून, हे रोटेशन कायम ठेवल्यास जानेवारीपर्यंत दिलासा मिळणार आहे. लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असतानाही मनपा प्रशासनाने नागझरी बंधार्‍यातील पाण्याकडे दुर्लक्ष केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. मांजरा प्रकल्पाला कोरड पडल्याने टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. कधी रेल्वेची तर कधी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यातच गेल्या आठ दिवसांपासून कुठे ना कुठे पाऊस पडत असल्याने पाणीसाठा वाढला आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मांजरा प्रकल्पात असलेल्या १.२ दलघमी पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, सध्या ४.८५ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. शिवाय, अजूनही पाणीसाठ्यात हळुहळू वाढ होत आहे. याचबरोबर नागझरी बॅरेजेसमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. पाच दिवसांपूर्वी काटगाव, कारसा, रूई, रामेश्वर, काटगाव तांडा आदी भागांत झालेल्या पावसामुळे या भागातील पाणीसाठे वाढले असून, हे पाणी मांजरा नदीला आले आहे. त्यामुळेच नागझरी बंधार्‍यात पाणीसाठा वाढला आहे. तीन दिवसांपासून उपसा... मांजरा नदीवरील नागझरी बॅरेजेस बंधार्‍यात पाणीसाठा वाढल्याने लातूर शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या बंधार्‍यातून गेल्या तीन दिवसांपासून पाणीउपसा सुरू केला आहे. मांजरा व नागझरी दोन्ही प्रकल्पांतून पाणी उपसा सुरू असून, हे पाणी आहे त्या रोटेशनप्रमाणे वापरल्यास जानेवारीपर्यंत लातूरकरांना दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्यात नागझरी बंधार्‍यातील पाणी उपसा न केल्याने टंचाईत भर पडल्याची ओरड झाल्याने आता प्रशासनाने नागझरी बंधार्‍यातील पाण्याला प्राधान्य दिले आहे. बंधार्‍यावरील मोटारी बंद करून विजेचे कनेक्शनही तोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तरीही पंधरा दिवसाला पाणी... मांजरा व नागझरी बंधार्‍यात वाढलेला पाणीसाठा हा दिलासा देणारा असला तरी महापालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात अद्याप बदल झालेला नाही. पंधरा दिवसांतून एकवेळा नळाला पाणी देण्यात येत होते. यापुढेही त्याच पद्धतीने नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.