शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नेवासा नगर पंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द

By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST

याद्या आज उपलब्ध होणार

याद्या आज उपलब्ध होणार
नेवासा : नेवासा नगर पंचायतीच्या निवडणूक मतदार यादीची अंतिम मतदार प्रसिद्धीची तारीख २० मार्च असतांना २२ मार्च रोजी अंतिम मतदार याद्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्या. गुरुवारी या याद्या उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिली
नगरपंचायत निवडणुकीसाठी विविध पक्षांमधील इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर गेली असताना राज्य शासनाने पुन्हा सुधारित अधिसूचना काढून निवडणुकीचा मार्ग मोकळा केला. मतदार याद्या कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदार याद्यांमध्ये अनेकांची नावे गायब तर काही मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागातून दुसर्‍या प्रभागात गेल्याने प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे प्रभाग १ ते १७ मध्ये १ हजार ६०५ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. तसेच मुख्याधिकारी रजेवर गेल्याने प्रशासनाने अतिरिक्त मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांची नियुक्ती केली.
२० मार्च रोजी निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम तारीख असताना प्रशासनाला मात्र त्या वेळेत प्रसिद्ध करता न आल्याने शहरात नगर पंचायत निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची अफवा पसरली होती. इच्छुक उमेदवार मात्र नगर पंचायत कार्यालय व झेरॉक्स केंद्रावर मतदार याद्या आल्या की नाही यासाठी चकरा मारताना दिसत होते. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा संपली असून २२ मार्च रोजी अंतिम मतदार याद्या निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्या.
नेवासा शहरात एकूण १३ हजार ९९६ मतदार असून प्रभाग निहाय अंतिम मतदार- प्रभाग एक ८५४, प्रभाग दोन- ८८५, प्रभाग तीन- १ हजार १८६, प्रभाग ४- ८१८, प्रभाग पाच- ४३६ ,प्रभाग सहा- े ९३२, प्रभाग सात- ७००, प्रभाग आठ- ६७५, प्रभाग नऊ- २५०, प्रभाग दहा-९०१, प्रभाग अकरा- १००२, प्रभाग बारा-११९०, प्रभाग तेरा- ७४४,प्रभाग चौदा-१०१२, प्रभाग पंधरा- ५९७, प्रभाग सोळा- ११३० तर प्रभाग सतरा ६८४. (शहर प्रतिनिधी)