गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST
ओतूर : डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या गेले १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. नाशिक, नवी मुंबई, तसेच संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची जोरात लगबग सुरू आहे.
गणेशमूर्ती रंगविण्याचे काम अंतिम टप्प्यात
ओतूर : डिंगोरे येथील महिला गणेशमूर्तिकार अरुणा सोनवणे या गेले १५ वर्षांपासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. नाशिक, नवी मुंबई, तसेच संपूर्ण जुन्नर तालुक्यातून विशेष मागणी असल्याने सध्या रंगकामाची जोरात लगबग सुरू आहे.डिंगोरे (ता. जुन्नर) येथे अरुणा संतोष सोनवणे या पदवीधर आहेत; परंतु नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वत:चा पिढीजात गणपती मूर्ती बनविण्याचे काम घरकाम सांभाळून करीत आहेत, त्यांचा गणपती बनविण्याचा एक कारखानाच आहे. अरुणा सोनवणे यांनी त्यांच्या कारखान्यात दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा, चिंचपोकळी आदी गणेशमूर्ती बनविलेल्या आहेत.या वर्षी जयमल्हार मालिकेवर आधारित गणेशमूर्ती बनविल्या आहेत. लालबागच्या राजाबरोबरच पद्मासन व सिंहासनारूढ जय मल्हार मूर्तींना विशेष मागणी आहे. त्यांनी या वर्षी ५ फूट उंचीच्या मल्हारी मार्तंडची मूर्तीही बनविली आहे.