शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

८ महिन्यांत केवळ चार बैठका जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांकडून ना मदत, ना संवाद हरी मोकाशे, लातूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी, चारा, रोजगार

By admin | Updated: September 17, 2015 00:30 IST

लातूर शहर व परिसरातील काही गावे वगळता तालुक्यातील काही गावांचा समावेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आहे़ त्यामुळे आमदारांची संख्या दोन आहे़ तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ९ आहे तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १८ आहे़ लातूर महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ७५ अशी आहे़ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक, मजूर हे चारा, पाणी, रोजगार अशा विविध समस्यांमध्ये अडकले आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या किमान पाणी, चारा, रोजगार अशा समस्या तरी सुटाव्यात म्हणून लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी जानेवारी ते आजपर्यंत चार बैठका घेतल्या आहेत़ या बैठकांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांना टंचाई निवारणासंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत़ तसेच पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नागझरी, साई, महापूर, कातपूर, साखरा, रेण

लातूर शहर व परिसरातील काही गावे वगळता तालुक्यातील काही गावांचा समावेश लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आहे़ त्यामुळे आमदारांची संख्या दोन आहे़ तालुक्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ९ आहे तर पंचायत समिती सदस्यांची संख्या १८ आहे़ लातूर महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या ७५ अशी आहे़ सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक, मजूर हे चारा, पाणी, रोजगार अशा विविध समस्यांमध्ये अडकले आहेत़ त्यामुळे नागरिकांच्या किमान पाणी, चारा, रोजगार अशा समस्या तरी सुटाव्यात म्हणून लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी जानेवारी ते आजपर्यंत चार बैठका घेतल्या आहेत़ या बैठकांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांना टंचाई निवारणासंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना केल्या आहेत़ तसेच पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून नागझरी, साई, महापूर, कातपूर, साखरा, रेणापूर तालुक्यातील इटी या गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे़ त्याचबरोबर शेतकर्‍यांशी संवाद साधला आहे़तालुक्यातील काही गावे ही ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येत आहेत़ आमदार अमित देशमुख यांच्या बैठकीतच आमदार त्र्यंबक भिसे यांनीही टंचाईचा आढावा घेतला आहे़ पक्षाच्या वतीने आखण्यात आलेल्या धोरणानुसार पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावे घेण्यात आले आहेत़ तसेच पक्षाच्या सूचनेनुसार आंदोलन करण्यात आले आहे़चौकट़़़जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांचे गाव कव्हा आहे़ या गावात सध्या कव्हेकर यांच्यातर्फे एक टँकर सुरु आहे़ या व्यतिरिक्त तालुक्यातील एकाही जिल्हा परिषद सदस्याने अथवा पंचायत समिती सदस्याने वैयक्तिकरित्या नागरिकांना मदत केली नसल्याचे पहावयास मिळत आहे़ पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांसह ठराविक सदस्यांनी दोन आठवड्यांपूर्वी केवळ एका पाणीपातळीची पाहणी केली आहे़सात नगरसेवकांचा पुढाकाऱ़़शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने सात नगरसेवकांनी शहरात सात मोफत टँकर सुरु केले आहेत़ त्यामुळे सदरील भागातील टंचाई निवारणासाठी मदत झाली आहे़