लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली
By admin | Updated: January 4, 2015 00:48 IST
लासलगाव : येथील बाजार समितीत गत सप्ताहात लाल कांद्याची आवक वाढली. १,०७,०२० क्विंटलची आवक होऊन बाजारभाव किंमत ५०० कमाल १.५९० रु. सर्वसाधारण १,३४० रु. प्रति क्विंटल राहिले.
लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढली
लासलगाव : येथील बाजार समितीत गत सप्ताहात लाल कांद्याची आवक वाढली. १,०७,०२० क्विंटलची आवक होऊन बाजारभाव किंमत ५०० कमाल १.५९० रु. सर्वसाधारण १,३४० रु. प्रति क्विंटल राहिले.बाजारभाव पुढीलप्रमाणे होते : गहू (४०९ क्विंटल आवक सरासरी १६७८ रुपये), बाजरी (११४ क्विंटल आवशक भाव सरासरी १४८० रुपये, बाजरी हायब्रीड भाव सरासरी १२४५ रुपये, हरभरा (५७ क्विंटल) लोकल भाव सरासरी २७१८ रुपये.मेथी : सर्वसाधारण भाव ४५२ रुपये, कोथिंबीर जुडी सर्वसाधारण भाव ४२३ रुपये, शेपू : जुडी सर्वसाधारण भाव ५०० रुपये, काकडी सर्वसाधारण भाव ४२३ रुपये.निफाड उपबाजार कांदा सरासरी १३०० रुपये, गहू सरासरी १७२१ रुपये. विंचूर उपबाजार गहू सरासरी १७१७ रुपये, हरभरा भाव सरासरी २९३१ रुपये, बाजरी भाव सरासरी १३५१ रुपये असे होते.(वार्ताहर)